एक्स्प्लोर

Sangli Lok Sabha Result 2024 live : सांगली लोकसभेत अपक्ष विशाल पाटील यांचा विजय, भाजपच्या संजयकाका पाटील यांचा पराभव

Sangli Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची सर्व यंत्रणा ही अपक्ष विशाल पाटलांच्या मागे उभी राहिल्याने त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटलांसमोर तगडं आव्हान निर्माण केलं होतं. 

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील हे सुरुवातीपासून आघाडीवर होते, त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत सांगली आपलीच असल्याचा संदेश दिला. 

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागावाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. महाविकास आघाडीने राज्यभर समन्वय साधून, भाजपविरोधात एकदिलाने काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली.

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं.  

Sangli Lok Sabha Result 2024 live | विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक अंदाजे मतदान 

मिरज                 62.10 टक्के

सांगली                58.20 टक्के

पलूस-कडेगाव     60.05 टक्के

खानापूर -आटपाडी   58.93 टक्के

तासगाव              66.06 टक्के

जत                    60.73 टक्के

सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आमदार

मिरज - सुरेश खाडे (भाजप) 
सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप) 
पलूस कडेगाव - विश्वजीत कदम (काँग्रेस)
खानापूर आटपाडी - रिक्त
तासगाव -  विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
जत - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)

सांगली लोकसभेचा 2019 सालचा निकाल

संजयकाका पाटील - भाजप - 5,08,995
विशाल पाटील - स्वाभिमानी - 3,44,643
गोपीचंद पडळकर - वंचित - 3,00,234

विजयी उमेदवार- संजयकाका पाटील, भाजप

महाविकास आघाडीमध्ये वाद आणि काँग्रेसची विशाल पाटलांना मदत

महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगतीची जागा ही सर्वाधिक वादाची ठरली. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत मिटला नाही. काँग्रेसने यावर नाराजी दर्शवली, अगदी दिल्लीवाऱ्याही केल्या. पण शिवसेना ठाकरे गटाने शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला.

काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी विशाल पाटलांना मदत केली. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड होतं. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचे पारडे जड झाले. 

दुसरीकडे भाजपचे संजयकाका पाटलांना तिसऱ्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. सुरुवातीला संजयकाका सहज निवडून येतील अशी चर्चा असताना नंतर मात्र विशाल पाटलांनी त्यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget