एक्स्प्लोर

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

Pune Exit Poll: मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 130 पेक्षा जास्त जागा जिंकत महायुती बहुमत मिळवेल, तर पुणे महापालिकेत 90 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज प्राबचा आहे.

मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान (Voting) पार पडले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उद्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणुकांचा संपूर्ण निकाल जाहीर होईल. तत्पूर्वी मतदानानंतरचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर येण्यास सुरुवात झाली असून मुंबई ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागणार असल्याचं या आकडेवारीवरन दिसून येतं. मुंबईनंतर सर्वाचं लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेतही (Mahapalika) भाजपच सत्ता काबिज करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे, येथील निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणूक निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल. मात्र, एक्झिट पोलचे आकडे ठाकरे बंधूंना आणि अजित पवारांना धक्का देणारे आहेत.

मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 130 पेक्षा जास्त जागा जिंकत महायुती बहुमत मिळवेल असा अंदाज आहे. तर, पुणे महापालिकेच्या 162 जागांपैकी 90 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज प्राबने वर्तवला आहे. तर, पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही प्राबने वर्तवलेला अंदाज भाजप महायुतीच्या बाजुने होता, त्याहीपेक्षा मोठं यश महायुतीला मिळालं होतं. त्यामुळे, आता प्राबचा अंदाज महापालिका निवडणुकांतही खरा ठरतो का, हे पाहावे लागेल.

प्राबच्या सर्वेक्षणानुसार पुण्यात भाजप

पॉलिटिकल ब्युरो अँड अॅनालिसिस ब्युरो म्हणजेच प्राब संस्थेनं पुणे महापालिकेचा एक्झिट पोल दिला असून पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा दावा या संस्थेनं केला आहे. प्राबच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार, पुण्यात भाजपला 91 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, प्राबच्या सर्वेक्षणानुसार पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का असून शिंदेंच्या शिवसेनेलाही कमी जागा जिंकता येत असल्याचं स्पष्ट होत आहे. प्राबच्या सर्वेक्षणानुसार, पुण्यात राष्ट्रवादीला 43 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा दे धक्काच म्हणता येईल.

पुणे महापालिका अंदाज

भाजप - 91

राष्ट्रवादी - 43

शिवसेना- 7

काँग्रेस  - 8

एक्सिस माय इंडियाचा सर्व्हे

AXIS माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असून भाजपला 131 ते 151 जागांवर विजय मिळत असल्याचा अंदाज एक्सिक माय इंडियाने केला आहे. तर, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागांवर विजय मिळत असल्याचं सर्वेक्षणातून दिसून येतं. या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 12 ते 16 आणि इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

भाजप+ = 131-151

ठाकरे बंधू = 58-68

काँग्रेस = 12-16

इतर = 6-12

जनमतचा एक्झिट पोल

महापालिकेसाठी जनमतचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 62 जागा मिळतील असं म्हटलंय. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी इतर पक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजप शिंदे - 138

ठाकरे- मनसे - 59

काँग्रेस-वंचित - 23

इतर - 7

हेही वाचा

BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget