एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळालेली 'ती' 9 प्रकरणं कोणती?
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नसल्याचा निर्वाळा देत विविध नऊ प्रकरणांमध्ये मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्याची परंपरा निवडणूक आयोगाने कायम राखली आहे. राजीव गांधींना भ्रष्टाचारी म्हणण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांना दिलासा दिला आहे. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नसल्याचा निर्वाळा देत याआधी विविध नऊ प्रकरणांमध्ये मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे.
मोदींना क्लीन चिट मिळालेली 'ती' वाक्यं
1. वर्धा, महाराष्ट्र (1 एप्रिल) - हिंदूबहुल मतदारांचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची काही पक्षांच्या नेत्यांना भीती वाटते. जिथे अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य आहे, तिथून काही जण निवडणूक लढवत असल्यावरुन हे सिद्ध होतं.
2. लातूर, महाराष्ट्र (9 एप्रिल) - मला नवमतदारांना सांगायचं आहे, तुमचं पहिलं मत पुलवामातील शहीद जवानांना समर्पित असणार का? (माकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार)
3. बारमेर, राजस्थान (21 एप्रिल) - पाकिस्तानच्या धमक्यांना भीक घालण्याचं धोरण भारताने थांबवलं आहे. दर दुसऱ्या दिवशी ते म्हणतात आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत. मग आमच्याकडे काय आहे? आम्ही बॉम्ब दिवाळीसाठी ठेवले आहेत का?
राजीव गांधींविरोधात टिप्पणी, पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून आणखी एक क्लीन चिट
4. नांदेड, महाराष्ट्र (6 एप्रिल) - काँग्रेस हे बुडतं टायटॅनिक जहाज आहे. जहाजातील लोक एक तर बुडत आहेत, किंवा जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या टाकत आहेत. काँग्रेसने मायक्रोस्कोप लावून अल्पसंख्याकांचं प्राबल्य असलेला मतदारसंघ निवडला. 5. वाराणसी, उत्तर प्रदेश (25 एप्रिल) - गेल्या पाच वर्षात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. पुलवामामध्ये त्यांनी आपल्या 40 जवानांचा जीव घेतला. त्यानंतर आम्ही पुलवामामध्ये 42 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही आमची कामाची पद्धत आहे. 6. पाटण, गुजरात (21 एप्रिल) - मोदी 12 मिसाईल घेऊन सज्ज होते. पाकिस्तानने भारतीय पायलट (वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान) यांची सुटका केली नसती, तर ती पाकिस्तानात 'कत्ल की रात' ठरली असती 7. अहमदाबाद, गुजरात (23 एप्रिल)- मतदानानंतर रोड शो करुन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप 8. कर्नाटक (1 मे) - राहुल गांधी यांना कागदाशिवाय बोलून दाखवण्याचं आवाहन 9. प्रतापगड, उत्तर प्रदेश (4 मे) - तुमच्या वडिलांचे खुशमस्करे त्यांना मिस्टर क्लीन म्हणायचे, पण त्यांच्या आयुष्याची अखेर 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हणून झाली.संबंधित बातम्या
निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'त्या' दोन प्रकरणी क्लीन चिट
'मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement