एक्स्प्लोर

महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला

Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली.

PM Modi on Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. भाजप 9, शिवसेना 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले. राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी घेतली. राज्यातील पराभवाची कारणे महायुतीकडून जाणून घेतली जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील पराभवाची कारणे जाणून घेतली. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून  प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. 

चुका सुधारा, विधानसभेला एकत्र काम करा, मोदींचे निर्देश - 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली. एकनाथ शिंदे,  प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठं फटका बसला, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती मोदींना दिली. राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याची देखील सांगण्यात आले. विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 

फडणवीस आज दिल्लीला जाणार - 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे.  केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget