एक्स्प्लोर

धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण

या घटनेत पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळील भागाचे नुकसान झाले आहे, ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रकार का अवलंबला याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश बंडखोरांना आपले अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र, काही ठिकाणी बंडखोरी कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच, पिंपरी चिंचवडमधून (Pune) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शासकीय कार्याललयात विधानसभेचे (Vidhansabha) निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांच्याकडून हा प्रयत्न झाला असून काळेवाडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, ओव्हाळ यांनी हे पाऊल का उचललं याबाबतचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे.

या घटनेत पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळील भागाचे नुकसान झाले आहे, ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रकार का अवलंबला याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळं संतापलेल्या ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओव्हाळ यांची नाराजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टलाही ओव्हाळ यांनी आयुक्तांची गाडी ही फोडली होती.  

विनायक ओव्हाळ सोबत आणखी दोघे उपस्थित होते. नागेश काळे हे दिव्यांग आणि अजय गायकवाड अशी त्यांची नावं आहेत. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्याच रिक्षातून ओव्हाळ ग प्रभागात आले होते, तिथूनच चिंचवड विधानसभेचे कामकाज चालते. काळे यांचं घरकुल योजनेतून मिळणारे घर प्रतीक्षेत आहे, तर गायकवाड यांनी ओव्हाळ यांना पवारांच्या कार्यालयात नेहण्याचं अन् खाली आणण्याचे काम केले. थेरगाव रुग्णालयात प्रचंड लूट होते, ही लूट थांबवावी म्हणून ते पालिकेकडे पाठपुरावा करतात. या सगळ्या प्रलंबित मागण्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर मान्य होतील, या अपेक्षेने त्यांनी हे नको ते पाऊल उचललं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली

हेही वाचा

फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget