Panchayat & ZP Election: मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी अपडेट, आठ जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारुप रचना जाहीर
Panchayat & ZP Election: आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे.

Panchayat & ZP Election: आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात 2, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूरला प्रत्येकी 1 गटाची भर पडली आहे. मराठवाड्यात 6 गट वाढल्याने गणांची संख्यादेखील 12 ने वाढली आहे.
आठ जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारुप रचना जाहीर
बीडला 1 गट, 2 गणांची भर : बीड जिल्ह्यात केज तालुक्यात येवता हा नवा गट तयार झाला. यात येवता आणि दहिफळ वडमाऊली हे 2 पंचायत समिती गण वाढले आहेत. या बदलामुळे आता जिल्हा परिषदेत 61 तर पंचायत समितीमध्ये 122 सदस्य निवडून जाणार आहेत.
जालन्यात हेलस नवा गट : जालना जिल्ह्यात हेलस हा नवा गट तयार झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या 57 गटांमध्ये आणि 114 पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होणार आहे.
लातूरला 1 गट वाढला : लातूरला जिल्हा परिषद गटांची संख्या एकने वाढली असून, दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे जि.प. सदस्यांची संख्या आता 59 होईल. तर पंचायत समितीच्या 118 गणांमध्ये निवडणूक होणार आहे.
धाराशिवला गट आणि गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच : धाराशिव जिल्ह्यात 55 गट आणि 110 गणांची संख्या प्रारूप रचनेत कायम ठेवण्यात आली आहे. परभणीत संख्या जुनीच असून परभणीत 37 गट तयार करण्यात आले असून गट क्र. 1 ते 10 जिंतूर, 11 ते 20 हे परभणी तालुक्यात पाडण्यात आलेले आहेत. परिणामी गट आणि गणांची संख्या पूर्वीइतकीच आहे.
हिंगोलीत 52 गटांचे प्रारूप जाहीर : हिंगोली जिल्ह्यातील 52 जि.प.गटांचे तर पंचायत समितीच्या 104 गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आले आहे. नांदेड मधील धनेगाव व अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा गट वाढला आहे. तसेच याच तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन गण वाढले आहेत. 2017 च्या निवडणुकीत 63 गट होते. मात्र या निवडणुकीत 2 गट व 4 गण वाढले आहेत. नांदेड व अर्धापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची भर पडणार आहे.
धाराशिवमध्ये पुर्वी प्रमानेच गण कायम
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा प्रकाशित करण्यात आलाय. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी प्रभाग रचना पुर्वी प्रमानेच कायम असल्याची माहिती दिलीय. पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेचे 55 गट तर पंचायत समिती 110 गण कायम राहणार आहेत. आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी रचना होती, तीच रचना कायम ठेवण्यात आली असून कोणास काही हरकती असल्यास नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.
हे ही वाचा
















