एक्स्प्लोर

Ajay Purkar On Chhatrapati Shivaji Maharaj: 'आम्ही अजूनही मानतो, रायगडावर न्याय होतो बरं का!'; शिवरायांच्या सिनेमांवर आक्षेप घेणाऱ्यांना भर कार्यक्रमात मराठी अभिनेत्याकडून तंबी

Ajay Purkar On Chhatrapati Shivaji Maharaj: गेल्या काही काळापासून या सिनेमांवर, सिनेमांच्या मालिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. तसेच, अनेकांनी आक्षेपही घेतलाय.

Ajay Purkar On Chhatrapati Shivaji Maharaj: दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'श्री शिवराज अष्टक' ही मालिका आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पाचही चित्रपट ऐतिहासिक भव्यता, मांडणी आणि अभिनयामुळे गाजले. आता या मालिकेतील सहावा चित्रपट रणपति शिवराय स्वारी आग्रा' 30 जावेलारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण, या सिनेमात चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नाहीतर, मराठी अभिनेता (Marathi Actor) अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetachandra) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत दिसणार आहे. पण, गेल्या काही काळापासून या सिनेमांवर, सिनेमांच्या मालिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. तसेच, अनेकांनी आक्षेपही घेतलाय. अशातच आता या सिनेमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात अजय पुरकर (Ajay purkar) यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आम्ही अजूनही सगळे मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का, असं कार्यक्रमात बोलताना अजय पूरकर म्हणाले आहेत.  

मराठी अभिनेते अजय पुरकर नेमकं काय म्हणाले? 

मराठी अभिनेते अजय पुरकर म्हणाले की, "जय शिवराय सर्वांना. शिवराज अष्टक. मी काय दिग्पाल काय, आम्ही कायम म्हणतो की, आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाहीये. ते संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे. सगळ्या माध्यम कर्मींचेही खूप धन्यवाद. 'शिवराज अष्टक' हे मी म्हटलं तसं महाराष्ट्राचं झालेलं आहे. किंबहुना ते भारताच्या बाहेरही गेलेलं आहे. आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स येत असतात. ते आम्हाला विचारतात, शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल? पुढचा चित्रपट काय असेल? आणि अनेकांनी आम्हाला मुद्दाम सांगितलेलं की, तुमच्या टीमकडून स्वारी आग्रा हे बघायचंच आहे. त्यामुळे, हा मुद्दा उपस्थित झालेला की, मधल्या काही काळानंतर कोण आता महाराज साकारणार? त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे..."

View this post on Instagram
 
A post shared by मराठी Box Office (@marathiboxoffice)

पुढे बोलताना अजय पुरकर म्हणाले की, "पण, आम्ही अजूनही सगळे मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का! अनेक लोक आहेत, जे समाजासाठी काम करू इच्छितात, चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात, ते सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणाऱ्या टीमच्या नशिबी तर असतातच असतात. तर, त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की, महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. त्यामुळे अजूनही रायगडावर न्याय होतो, कोणीही या गैरसमजात राहू नये की, हे काम बंद पडू शकतं, असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत. आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा, आज तुमच्या माध्यमातून सांगतोय. फक्त नावं घेत नाहीये..."

अजय पूरकर कोण? 

मराठी अभिनेते अजय पुरकर म्हणजे, मनोरंजन विश्वातलं गाजलेलं नाव. आजवर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'असंभव', 'तू तिथे मी', 'राजा शिवछत्रपति' या प्रसिद्ध मराठी मालिकांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला. या सोबतच प्रेमाची गोष्‍ट (2013), संघर्ष (2014) आणि मुंबई टाइम्स (2016) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिग्पाल लांजेकरच्या 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमात चिन्मय मांडलेकर नाही 'हा' अभिनेता साकारणार शिवराय; ओळखलं का कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
Embed widget