एक्स्प्लोर

Palghar Lok Sabha Constituency Election Result 2024 live : पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरा यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतं; बोईसरकरांमुळे भारती कामडी पडल्या मागे

Palghar Lok Sabha Election Result 2024 : पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून 63.91% मतदान झालं आहे. या लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली.

Palghar : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून 63.91% मतदान झालं आहे. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. या लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर मध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी 147300 अशी निर्णायक मोठी आघाडी घेतली

पालघर लोकसभा निकाल 2024 (Palghar Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
डॉ. हेमंत सावरा भाजप विजयी
भारती कामडी शिवसेना ठाकरे गट  
राजेश पाटील बहुजन विकास आघाडी  

Palghar Lok Sabha Constituency Election Result 2024 live : पालघर लोकसभेत 63.91 टक्के मतदान 

पालघर लोकसभा मतदार संघात 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी 63.91 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 21,48,514 मतदार असून त्यापैकी 13,73,172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात 10,23,080 महिला मतदार आहेत. त्यापैकी 06,40,628 महिलांनी मतदान केले. तसेच 11,25,209 पुरुष मतदार असून त्यापैकी 07,32,446 मतदारांनी मतदान केले आहे. त्याचप्रमाणे 225 तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Palghar Lok Sabha Constituency Election Result 2024 live : कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Palghar Lok Sabha Voting Percentage 2024)

  • एकूण मतदान - 63.91
  •  डहाणू - 63.75 टक्के
  • पालघर - 70.34 टक्के
  • नालासोपारा - 52.32 टक्के
  • विक्रमगड - 74.45 टक्के
  • बोईसर - 64.65 टक्के
  • वसई - 59.12 टक्के

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

  • डहाणू - विनोद निकोले - कम्युनिस्ट पार्टी
  • पालघर - श्रीनिवास वनगा - शिवसेना (शिंदे गट)
  • विक्रमगड - सुनील भुसारा - राष्ट्रवादी (शरद पवार गट)
  • बोईसर - राजेश पाटील - बविआ
  • नालासोपारा - क्षितिज ठाकूर - बविआ
  • वसई - हिंतेद्र ठाकूर - बविआ

विधानसभेनुसार मतदानाची आकडेवारी

डॉ हेमंत सावरा,भाजप,महायुती (विजयी) 1,84,422

डहाणू - 83000
विक्रमगड - 106053
पालघर - 93591
बोईसर - 104439
नालासोपारा - 136818
वसई - 76307
टपाली मत-1036
एकूण - 6,01,244

भारती कामडी - उबाठा महाविकास आघाडी

डहाणू - 83822
विक्रमगड - 72844
पालघर - 64352
बोईसर - 62706
नालासोपारा - 66150
वसई - 66888
टपाली मत - 1116
एकूण - 4,16,822

राजेश पाटील, बवीआ 

डहाणू - 12792
विक्रमगड - 22070
पालघर - 23530
बोईसर - 65291
नालासोपारा - 79460
वसई - 50868
टपाली मत - 506
एकूण - 2,54,517

2019 सालचा निवडणूक निकाल? (Palghar Lok Sabha Constituency 2019 Result)

- राजेंद्र गावित - 5,15,000 (48.30)
- बळीराम जाधव - 4,91,596 - (46.90)
- सुरेश पाडवी - 13,728 (1.14)
- 2019 साली राजेंद्र गावित विजयी

पालघरमध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच; विधानसभेला काय होणार?

लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांत उमेदवारीसाठी पक्ष व उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. पालघर मतदारसंघातही असेच चित्र शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळाले. त्यामुळे विधानसभेसाठीही असेच चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे सर्वात आधी नाव जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर झाला तर अवघे दोन दिवस बाकी असताना बविआने आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे आता विधानसभेला काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

पालघर लोकसभा निवडणुकीचा इतिहास काय? History Of Palghar Lok Sabha Constituency
2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे चिंतामण वणगा विजयी झाले. तर, 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी बाजी मारली. 2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सन 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले होते. राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यानंतर गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 48.30 टक्के अर्थात 5 लाख 15 हजार मते मिळाली होती. तर, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 46.90 टक्के अर्थात 4 लाख 91 हजार 596 मते मिळाली. गावित यांनी 23 हजार 404 मतांनी विजय मिळवला. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या

Palghar Lok Sabha Elections 2024 : पालघरमध्ये चुरशीची तिरंगी लढत; विजयाचा गुलाल कोण उधळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget