एक्स्प्लोर

दिवाळीचा फराळ अन् पाकिटात 3000 रुपये; रोहित पाटलांच्या मतदारसंघात गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आहे.

सांगली : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. दुसरीकडे बड्या नेत्यांच्या सभांचं नियोजन होत असून त्यांचे दौरे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उमेदवारांकडून मतदारसंघातील गाव ते गाव आणि डोअर टू डोअर प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, रोहित पाटील (Rohit patil) उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदाराना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी (Police) पाटील गटाचे समर्थक ठाण मांडून बसले आहेत.  

शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजयकाका पाटील गटाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप असून मोठ्या संख्येने संजय काका गटाचे कार्यकर्ते येथे जमले आहेत. या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला आहे. तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अतिशय़ निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहित मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचंही संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची फ्लाईंग स्कॉडकडून संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर  फ्लाईंग स्कॉडकडून  पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पैसे वाटत असलेल्या कार्यकर्त्यांना संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला नेले आहे. त्यामुळे, मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पैसे वाटणाऱ्या एकाने आपण शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचे कबूल केल्याचाही दावा करत एक व्हिडिओ देखील संजयकाका पाटील गटाने सोशल मीडियातून सार्वजनिक केला आहे. 

हेही वाचा

एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना फोडली; ठाकरेंच्या खासदाराने तोफ डागली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Embed widget