एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना फोडली; ठाकरेंच्या खासदाराने तोफ डागली

शिवसेना पक्ष असाच सहज फुटला नाही एकनाथ शिंदे यांचा एक जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेतला त्यावेळी भाजपातुन शिंदे यांना दाब दिला जात होता.

धाराशिव : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले असून दिवाळीचे फटाकेही फुटले आहेत. त्यामुळे, निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू केला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाही चुरशीच्या लढती आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राजकीय चिखलफेक पाहायला मिळेल. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गुवाहटी दौऱ्यावरुन हल्लाबोल केला जाईल. शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंचा जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना पक्ष फुटला, असा गौप्यस्फोटच ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. 

शिवसेना पक्ष असाच सहज फुटला नाही एकनाथ शिंदे यांचा एक जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेतला त्यावेळी भाजपातुन शिंदे यांना दाब दिला जात होता. शिवसेना पक्ष फोडून येतो की जेलात जातो, त्यामुळे पक्ष फोडून एकनाथ शिंदेंसह हे आमदार गेले. तसेच अजित पवार यांचा 70 हजार करोडचा घोटाळा काढला अन् अजित पवार सातव्याच दिवशी यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. भाजप हे कटकारस्थानी असून महाराष्ट्रातील राजकारण नासवून टाकायचे काम भाजपने केलय. शेतकऱ्यांना देशोधडीला लावलय, अशी घणाघाती टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. मविआचे ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मुख्यमंत्री शिदेंच्या बंडावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

गद्दारीत सहभागी झालो नाही - ओमराजे

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे कैलास घाडगे पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी कळंब तालुक्यातील देवधानोरा येथे आज प्रचाराचा नारळ फोडला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मिळत नसलेला भाव. दूध उत्पादक शेईतकऱ्यांच्या अनुदानाची घोषणा मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून अडवलेली कामं हे प्रश्न घेऊन जनतेत जाणार असल्यास कैलास पाटील म्हणाले. 

दरम्यान, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. 2019 ला धनुष्यबाण या चिन्हावर लढलेले कैलास पाटील. आता त्यांच्यासमोर धनुष्यबाण चिन्ह घेऊन महायुतीत शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे असणार आहेत. त्यावर बोलताना तालुक्यातील जनता खऱ्या शिवसेने सोबत राहील लोकसभेलाही आपल्याला ते पाहायला मिळाल्याचं कैलास पाटील म्हणाले. 

हेही वाचा

प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget