एक्स्प्लोर
Advertisement
उदयनराजेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावीत, नरेंद्र पाटील यांची टीका
सुरुची राड्यातील सुमारे दीडशेच्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. मात्र यात उदनयराजेंना का हद्दपारीची नोटीस पोलिसांनी काढली नाही, असे पाटील म्हणाले.
सातारा : उदयनराजेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शुध्दीत द्यावी, असा टोला आज सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंनी सातारा जिल्ह्याचा कुठलाही विकास केला नसल्याचीही टीका केली. यावेळी पाटील यांनी उदयनराजेंनी प्रचारासाठी घेतलेल्या हॉटेल मालकाने नगरपालिकेचा 53 लाखाचा कर भरला नसल्याची कागदपत्रे सादर केली.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करुन त्यांनी निवडणूक आयोगाने त्यांची कागदपत्रं चेक केली नाहीत का? असा आरोप केला. यावेळी ते म्हणाले की, आनेवाडी टोल नाक्याच्या कारणातून 2017 मध्ये झालेल्या सुरुची राड्यातील सुमारे दीडशेच्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. मात्र यात उदनयराजेंना का हद्दपारीची नोटीस पोलिसांनी काढली नाही, असे पाटील म्हणाले.
यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मतदारांना त्रास देण्याचे काम या लोकांकडून होऊ शकते. त्यामुळे यांना मतदान प्रक्रियेपासून अलिप्त ठेवणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यात निधीबाबत आकड्यांच्या बदलावरून त्यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले. विद्यमान खासदारांनी कुठून आणि कुठला निधी आणला हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement