नरेंद्र मोदींनी सरकार बनवू नये, कारण....काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं सांगितला 35 वर्षापूर्वीचा किस्सा
Lok Sabha Elections 2024 : भाजपने सरकार स्थापन करु नये, असे वक्तव्य राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केलं आहे.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) स्वतंत्र बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, मात्र, भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळं भाजपनं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने सरकार स्थापन करु नये, असे वक्तव्य राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केलं आहे. भाजपने का सत्ता स्थापन करु नये हे सांगताना पायलट यांनी 35 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे.
35 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला जनतेनं नाकारल्याचे सचिन पायलट म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू नये असे पायलट म्हणाले. भाजपने आत्मपरीक्षण करावं असेही ते म्हणाले. दरम्यान, हे सांगताना त्यांनी 35 वर्षापूर्वीचा म्हणजे 1989 चा एक किस्सा सांगितला आहे. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींना सुमारे 200 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना सरकार बनवण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना जनादेश मिळाला नसल्याचे सांगून त्यांनी नकार दिला. त्यानंतर, पुढच्या सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. दरम्यान, सध्या लोकसभेचे निकाल हे भाजप आणि एनडीएच्या विरोधात आहेत. त्यामुळं त्यांनी सरकार स्थापन करु असे सचिन पायलट म्हणाले.
सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सीचा भाजपने गैरवापर केला
लोकांनी भाजपच्या 'मंदिर मशीद', हिंदू-मुस्लिम अशा मुद्द्यांना नाकारले आहे. केंद्र सरकारने विशेषत: विरोधकांना लक्ष्य केले. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचे सचिन पायलट म्हणाले. सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सीचा भाजपने गैरवापर केल्याचे पायलट म्हणाले. त्यांची ही सर्व कामे जनतेने नाकारल्याचे पायलट म्हणाले. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पार चा नारा दिला होता. मात्र, भाजपला 250 जागांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. लोकांनी यावेळी भाजपला बहुमत नाकारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला 292 जागा, तर इंडिया आघाडीला 234 जागा
या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये वैयक्तिक भारतीय जनता पक्षाला 244 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसला वैयक्तिक 99 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर समाजवादी पक्षाला 37 तर टीएमसीला 29 जागा मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: