एक्स्प्लोर

Narendra Modi: आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

Narendr Modi: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचे स्वप्न होते. हे आमच्या सरकाने पूर्ण केले, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Narendra Modi Vadhavan Port Project धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध ठिकाणी राजकीय सभा होत आहे. धुळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर सांगलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. धुळ्यातील सभेत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महायुती सरकारच्या योजना आणि विविध प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराबाबतची महत्वाची माहिती देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

इलेक्ट्रॉनिक वाहन परियोजना, स्टील प्रोजेक्ट, ग्रीन प्रोजेक्ट असे राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थापित केले जात आहे. महाराष्ट्रात वाढवण बंद देखील होत आहे. मूलभूत सुविधा मुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत. वाढवण बंदरासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, एवढे सर्व करत आहात तर तिथे एक विमानतळ देखील द्या...मी आज देवेंद्र फडणवीसांना सांगतो...जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल,  आचारसंहिता संपले, तेव्हा वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले. 

महायुतीचे सरकार आल्यास 15 हजार रुपये देणार- नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांना देखील डबल फायदा होत आहे. नमो शेतकरीचे 6 हजार आणि पीएम किसान योजना असे 12 हजार रुपये मिळत आहेत. आता महायुतीचे सरकार आल्यास ही रक्कम 15 हजार रुपये करण्यात येणार, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. विरोधक नारी शक्तीला सशक्त होऊ देत नाहीय. हे लोक महिलांना शिव्या देत आहेत. राज्यातील महिला महाविकास आघाडीला माफ करणार नाही. 

आमच्या सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला- नरेंद्र मोदी

मातृभाषा आपली आई असते, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचे स्वप्न होते. हे आमच्या सरकाने पूर्ण केले. काँग्रेसची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती, तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यांना अजूनही त्रास होतोय की, हे आम्ही कसे केले...महाराष्ट्रामधील डबल इंजिन सरकारने केलेलं काम संपूर्ण जग पाहत आहे. सलग दोन वर्षे महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकमध्ये 1 नंबरचं राज्य आहे, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले. काँगेसने इतके वर्ष राज्य केले. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू का केले नाही?, असा सवालही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला. 

भारतचा आधार महायुतीचा वचनमनामा बनेल- नरेंद्र मोदी

विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतचा आधार महायुतीचा वचनमनामा बनेल. मागील 10 वर्षात महिलांना केंद्रित अनेक योजना आणल्या. मागील सरकारने महिलांना रस्ता अडवला होता. आम्ही सर्व अडथळे दूर केले, सर्व दरवाजे खोलले. महिलांना आरक्षण दिले, शौचालय ते गॅस सिलेंडर आशा प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आहेत. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केले आहे. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. महिलांचे सामर्थ्य वाढत आहेत, मुलींना रोजगार मिळणार, महिला सशक्तीकरणसाठी आमचे सरकार पावले उचलत आहेत ते आमच्या विरोधकांना सहन होत नाहीय. माझी लाडकी बहिण योजनांची देशभरात चर्चा आहे. काँग्रेसचे लोक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. त्यांना सत्ता मिळाली तर ही योजना बंद करतील, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली. 

संबंधित बातमी:

कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, एकनाथ शिंदेंनी मागवला अहवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget