(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'हा विकासाचा, सुशासनाचा विजय', पंतप्रधान मोदींनी मानले महाराष्ट्राचे आभार; विधानसभा निकालानंतर पहिली प्रतिक्रिया
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
Narendra Modi Reaction on Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात महायुतीच्या सरकारने यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) घवघवीत यश संपादन केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने महाराष्ट्राचा कौल आपल्या बाजूने वळवून घेतलाय. महायुतीच्या महाराष्ट्रातील यशानंतर पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.
हा विकासाचा, सुशासनाचा विजय असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जनतेचे मनापासून आभार मानलेत. तसेच पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंचेही फोनवरुन आभार मानले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपप्रणित महायुतीचं सरकारमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट हा भाजपचाच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, विकासाचा, सुशासनाचा विजय आहे!माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची महायुती कार्यरत राहील! जय महाराष्ट्र!
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली : अजित पवार
कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. महाराष्ट्रात अपयश आलं होतं, ते अपयश आम्ही मान्य केलं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजर झाली. अंडरकरंट असा बहिणींनी दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, हे माझं स्पष्ट मत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे. आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार. समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं. गेले अडीच वर्षे आम्ही जे काम केलं त्याची ही पोचपावती आहे. मी लोकांचे आभार मानतो. पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे.
विकासाचा विजय!
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024
सुशासनाचा विजय!
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ.
रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे.
जनतेला मी ग्वाही देतो की…