एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अमरावती जिल्ह्याचा धक्कादायक निकाल! काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, बच्चू कडूंसह मविआला फटका, रवी राणांचा चौथ्यांदा दणदणीत विजय

Amravati Vidhan Sabha Election 2024: अमरावती जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय.

Amravati District Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे. 

बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांनी 37 हजार मतांच्या मताधिक्यांनी  चौथ्यांदा विजय संपादन केला  आहे. यावर बोलताना रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्यावर टिका केली. लोकसभेत नवनीत राणांना पराभूत केलं, हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे जनतेनी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांना दणका दिला. बच्चू कडू यांनी चिंतन करावं आणि जनतेची सेवा करावी, असा टोला ही रवी राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला.

अमरावती जिल्हा निकाल

भाजप - 5
युवा स्वाभिमान - 1
राष्ट्रवादी अजित पवार - 1
उबाठा गट - 1

अमरावती विधानसभा - महायुतीतील अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 5413 मतांनी विजयी

बडनेरा -  युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी 

धामणगाव रेल्वे - महायुतीतील भाजपचे प्रताप अडसड 15950 मतांनी दुसऱ्यांदा विजय.. 

दर्यापूर - महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे गजानन लवटे विजयी...

तिवसा - महायुतीतील भाजपचे राजेश वानखेडे  विजयी..

अचलपूर - महायुतीतील भाजप उमेदवार प्रवीण तायडे 12435 मतांनी विजयी 

मोर्शी - महायुतीतील भाजप उमेदवार उमेश यावलकर 61863 मतांनी विजयी 

मेळघाट - महायुतीतील भाजप उमेदवार केवलराम काळे 107233 मतांनी विजयी

यशोमती ठाकूर यांचाही पराभव 

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यांनंतर 8195 मतांचा लीड होता. अखेर आता यशोमती ठाकूर यांचा पराभव झाल्याचे निश्चित मानले जात आहे. 

कोण कोणते नेते पराभूत ? 

राजेश टोपे
बाळासाहेब पाटील
पृथ्वीराज चव्हाण 
बाळासाहेब थोरात 
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील  
रोहित पवार 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Radhanagari Vidhan Sabha : प्रकाश आबिटकरांची हॅट्ट्रिक; राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराची अशी कामगिरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget