एक्स्प्लोर

Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!

Suhas Kande vs Sameer Bhujbal : नांदगावमध्ये सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अचानक अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा झाला.

नाशिक : विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.  मतदानाला दोन तास होत नाही तोच नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Vidhan Sabha Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले. 

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अचानक अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला होता. मतदारांना जावू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा समीर भुजबळांनी घेतला होता. यानंतर घटनास्थळी सुहास कांदे दाखल झाले. यावेळी दोन्ही गटामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. 

भुजबळ, कांदेंनी दिले एकमेकांना प्रतिआव्हान 

सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळांना आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे, तुझ्यासारखे 56 पाहिले, असे म्हणत सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

मतदार स्थानिक गावचे रहिवासी 

काही वेळाने निवडणूक आयोगाने पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये थांबविलेल्या मतदारांची चौकशी व बॅग तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिध्द झाले. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरले जात असल्याचा मतदारांनी आरोप केला. अडविलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. तर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा

Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget