एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nanded Loksabha Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे पानिपत, विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ, पण लोकसभेच्या पोटनिवडणुकीत बाजी मारली

Nanded Loksabha Election : विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी विजय मिळवलाय.

Nanded Loksabha Election : विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत, या निकालामध्ये नांदेड जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जीवावर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना जबरदस्त टक्कर देत लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच वाताहात झाल्याचे पाहायला मिळाले. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस म्हणजेच अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच काँग्रेस हे समीकरण जुळलेले होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता अशोक चव्हाण म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच अशोक चव्हाण असं म्हणायची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी नऊ पैकी नऊ जागा काँग्रेसच्या निवडून आणल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आल्यानंतर करून दाखवली. 

लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मिळाला. जरागे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला चांगलाच झटका बसला होता. विधानसभेसाठी देखील हा फॅक्टर चालेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. मात्र या निवडणुकीत लाडकी बहीण योजना ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभा राहिल्याचे स्पष्ट झाले. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भोकर मतदारसंघ जाहीर सभा कॉर्नर बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र, अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून होते. मला संपवायला सगळेजण भोकरला घेत असल्याचा दावा देखील अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगला विजय मिळवलाय. 

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मोर्चे बांधणी केली होती. चांगले उमेदवार देखील मैदानात उतरवले होते. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत नऊ मतदारसंघात काँग्रेसला क्रमांक दोनची मत मिळवण्याकरिता सुद्धा चांगली दमछाक करावी लागली. अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचा चांगला सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. एकेकाळी काँग्रेसचे चार आमदार 2019 च्या निवडणुकीत निवडून आले. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना देखील पराभव पहावा लागला. पाच महिन्यापूर्वी काँग्रेसची लाट या मतदारसंघात फिरत होती, प्रचार देखील सुरू झाला होता, मात्र आता या धक्कादायक लागलेल्या निकालामुळे काँग्रेसला स्वतःलाच आता आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. 

विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघात आभार बैठका घेत मतदारांचे आभार मानले.  अशोक चव्हाण यांचे एक विधान सध्या चांगले चर्चेत आलेले आहे. ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांच्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी भोकर  मतदार संघात नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आमदार होताच दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट, मोठं कारण समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget