Nagpur Lok Sabha Result 2024 : नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींच्या विजयाची हॅटट्रिक ; तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा दारूण पराभव
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे राज्यासह अवघा देशाचे लक्ष लागले होते. अखेर नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक करत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा दारूण पराभव केला आहे.
Nagpur Lok Sabha Result 2024 : राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतील गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Election Result 2024) पहिल्या फेरी पासून नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी 1,07,926 मतांनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे.
देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Lok Sabha Result) मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. देशभरासह महाराष्ट्रातील मतदानाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरुवात ज्या विदर्भापासून सुरवात झाली त्या विदर्भातील सुरुवातीचे कल हाती आले आहे.
विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरी पासून नितीन गडकरींची सरसी कायम असल्याच्या चित्र आहे. यात सकाळी 12 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नितीन गडकरी 1 लाख 54 हजार 466 मते घेत 41 हजार मतांनी पूढे आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी 1 लाख 13 हजार 918 मते मिळवली आहे. दुसरीकडे उर्वरित विदर्भात महाविकास आघाडीने काहीशी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. हा कल सकाळी 12 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.
मतमोजणीत काँग्रेसच्या विकास ठाकरेंची पिछाडी कायम
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे(Nagpur Lok Sabha Election Result 2024) राज्यासह अवघा देशाचे लक्ष लागले आहे. त्यामागील कारण म्हणजे भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. नितीन गडकरींनी गेल्या काही वर्षांच्या कार्यकाळात नागपूरसह देशभरात केलेल्या चांगल्या आणि वेगळ्या विकासकामामुळे देश पातळीवर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. शिवाय याच विकासकामांच्या जोरावर आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही नितीन गडकरींनी वेळो वेळी बोलून दाखवला आहे.
अशातच नितीन गडकरींच्या विरोधात कुणीही विरोधी उमेदवार उभा न करता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा एक सुरही नागपूरकरांचा होता. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसने शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना रिंगणात उतरवत गडकरींना टक्कर देण्यासाठी 'ग्राउंड' वरील नेत्याला उतरवून नागपूरची लढत एकतर्फी होणार नाही, याची तजवीज केली होती. त्यामुळे सुरवातीला प्रचार न करण्याच्या विचारात असलेल्या नितीन गडकरींना प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे ही पहायला मिळाले. त्यामुळे आता नागपूरकर गडकरींच्या विकासकामांना साथ देत त्यांच्या विजयाची हॅटट्रिक करतात, की काँग्रेसच्या विकास ठाकरेंना यंदा संधी देत कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या मतदारसंघ परत मिळवून देतात याकडे सऱ्यांचे लक्ष लागले होते.
नागपूर लोकसभा निकाल 2024 (Nagpur Lok Sabha Election Result 2024)
उमेदवाराचे नाव | पक्ष | मिळालेली मते | निकाल |
नितीन गडकरी | भाजप | विजयी | |
विकास ठाकरे | काँग्रेस | पराभूत |
नागपूरात किती टक्के झाले मतदान?
नागपुरात एकूण 54.33 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे पूर्व विदर्भात 55.76 टक्के मतदान झाले आहे. तर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये 53.03 टक्के , दक्षिण नागपूरमध्ये 52.80 टक्के मतदान, पूर्व नागपूरमध्ये 55.76 टक्के मतदान, मध्य नागपूर मध्ये 54.02, पश्चिम नागपूरमध्ये 53.71 टक्के मतदान, उत्तर नागपूरमध्ये 55.16 टक्के मतदान, असे एकूण 54.33 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. तर नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 22,23,281 मतदार आहे. त्यापैकी प्रत्यक्षात 12,07,344 मतदान केले. तर उर्वरित 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटत्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला आणि नुकसान कुणाला, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नितीन गडकरी यांच्या विजयाची हॅटट्रिक
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र असलेला हा मतदारसंघ परंपरागतरित्या काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र 2014 नंतर देशात झालेले राजकीय परिवर्तन आणि नागपूरला नितीन गडकारींसारखा(Nitin Gadkari) दिग्गज नेता मिळाल्यानंतर नागपूरकर मतदारांनी भाजपला (BJP) भक्कम साथ दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या तुलनेत गेल्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य काहीसे घटले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. विदर्भात सर्वच निवडणुकांमध्ये कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत पहायला मिळते. त्यामुळे यंदा देखील काही अंशी चरशीची लढत असल्याचे बघायला मिळत आहे.
काँग्रेसचा गड राखण्यात विकास ठाकरे यांना अपयश
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर काँग्रेसने शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवत गडकरींना टक्कर देण्यासाठी 'ग्राउंड' वरील नेत्याला उतरवून नागपूरची लढत एकतर्फी होणार नाही, याची तजवीज केली होती. आ. ठाकरे हे गेल्या दहा वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. दांडगा राजकीय अनुभव, पक्ष संघटनेवर असलेली पकड व शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत असलेला संपर्क पाहता काँग्रेसने ठाकरे यांना रिंगणात उतरविले आहे. ठाकरे यांना बऱ्याचदा पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. मात्र, यावेळी त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेते एकवटल्याचे चित्र असून, कार्यकर्त्यांध्येही जोश आहे.
आ. विकास ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत एकूण 8 निवडणुका लढविल्या आहेत. महापालिकेची निवडणूक पाच वेळा लढले व तीन वेळा जिंकले, तर विधानसभेची निवडणूक तीन वेळा लढले व एकदा जिंकले. नागपूर लोकसभेच्या निमित्ताने ते नवव्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 1997 मध्ये ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते पराभूत झाले. मात्र, काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यानंतर 2002 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली अन् ते विजयी झाले व पहिल्याच टर्ममध्ये नागपूरचे महापौर बनले. यानंतर 2007 मध्ये विजयी होत ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते झाले.2012 मध्येही त्यांनी विजय नोंदविला. 2017 मध्ये मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीत 2009 मध्ये दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लढत दिली व पराभूत झाले. पुढे 2014 मध्येही पश्चिम नागपुरात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये मात्र त्यांना पश्चिम नागपुरातून विधानसभा गाठण्यात यश आले.
2019 चा निकाल काय होता? (Nagpur Lok Sabha Constituency Result 2019)
उमेदवार | पक्ष | मतदान | निकाल |
नितीन गडकरी | भाजप | 6, 60,221 | विजयी |
नाना पटोले | काँग्रेस | 4,44,212 | पराभव |
मोहम्मद जमाल | बीएसपी | 31,725 | पराभव |
नोटा | - | - | - |
पुरुष मतदार 10,97,087
महिला मतदार 10,63,932
इतर मतदार 77
एकूण मतदार21,61,096
इतर महत्वाच्या बातम्या