नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यासह 50 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Crime : मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके व पन्नास सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून शासकीय संपत्ती या नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय
Nagpur Crime : मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके व पन्नास सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून शासकीय संपत्ती या नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. मध्य नागपूर मधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यासह 50 पेक्षा जास्त जणांवर ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय संपत्तीची तोडफोड करणे, असे गुन्हे बंटी शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात नोंदवण्यात आले आहे...
मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर काल संध्याकाळी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात एका मतदान केंद्रावरून झोनल अधिकारी व इतर मतदान कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या दोन सरकारी वाहनांची तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचवत त्यांना सुरक्षित बाहेर काढले होते. तसेच त्या वाहनात ठेवलेली अतिरिक्त ईव्हीएम ही पोलिसांनी सुरक्षितेतल्या बाहेर काढली होती. या घटनेनंतर महाल परिसरातील झेंडा चौक तसेच कोतवाली पोलीस स्टेशन समोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादही झाले होते.
ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची अडवणूक करणे आणि त्यात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत बंटी शेळके आणि त्यांच्या 50 सहकार्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय संपत्तीची तोडफोड करणे असे गुन्हे नोंदवले आहे... दरम्यान नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच कडे सोपवलं असून अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही...
काय आहे प्रकरण?
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरातील एका मतदान केंद्राच्या आवारातून एक तवेरा गाडी बाहेर पडली. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी काही ईव्हीएम घेऊन जात असतानाचे जमावाला दिसले. मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, त्याचे हे उल्लंघन होत आहे या संशयातून जमावातील काही लोकांनी त्या तवेरा कारचा पाठलाग केला. आणि काही अंतरावर ती तवेरा थांबवून त्याची जबर तोडफोड केली. त्याच वेळेस पाठीमागून इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी तवेरा घटनास्थळी पोहोचली आणि जमावातील काही लोकांनी त्याच्यावर ही दगडफेक केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या