भाजपच्या त्रासामुळे माझ्या पत्नीला कर्करोग झाला, आजवर त्यांना 14 कीमोथेरेपी घ्याव्या लागल्या; अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप
Maharashtra Assembly Election 2024: भाजपने मला ज्या पद्धतीने ईडी, सीबीआयचा त्रास दिला, त्यामुळे माझी पत्नीला कर्करोग झाला आहे. असा मोठा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 नागपूर: भाजप सरकार मागील तीन वर्षापासून माझ्या मागे लागलय, तरी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी काटोलमधून (Katol Assembly Constituency) उमेदवारी फॉर्म भरला नाही, कारण या सत्ताधाऱ्यांनी नियोजन केलं होतं की अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढा आणि तो फॉर्म रद्द करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी खास दिल्लीतून मोठे वकीलही आणून ठेवले आहे. जे रश्मी बर्वे सोबत झालं तसंच माझ्यासोबत करण्याचा डाव यांचा होता. दरम्यान, भाजपने मला ज्या पद्धतीने ईडी, सीबीआयचा त्रास दिला, त्यामुळे माझी पत्नीला कर्करोग झाला आहे. आजवर त्यांना 14 कीमोथेरेपी ही घ्याव्या लागल्या आहे, असा मोठा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.
...म्हणून माझ्या एवजी सलील देशमुखांना उमेदवारी
माझ्यावर कसे खोटे आरोप लावून फसवण्यात आले, कसे 14 महिने तुरुंगात ठेवले, या सर्व बाबी संदर्भात सर्व काही लिहिले आहे. दोन तीन दिवसात पुस्तक बाजारात येईल. त्यानंतर गिरीश महाजन विरोधात सीबीआयचा खटला भरला. मी पुन्हा उभा राहिलो असतो तर पुन्हा नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभं न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. सलीलने मला आग्रह करत उभे राहण्यास म्हंटले, मात्र मी त्याला समजावून सांगितले आणि तो तयार झाला. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार माहाविकास आघाडीचे येणार आहे. त्यानंतर शरद पवार साहेब पहिला विधान परिषदेचा सदस्य आम्हाला बनवतील असा विश्वास आहे. ते मला मंत्रिमंडळातही घेतील असाही विश्वास आहे. मात्र त्यासाठी सलीलला विजयी करावे लागेल. अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
एकदा भूल केली, आता तशी भूल काटोलची जनता करणार नाही
कोविड काळामध्ये मी सातत्याने घरी न बसता मतदारसंघात काम केले. अनिल देशमुख मंत्री असताना मी मतदार संघातील काम सांभाळत होतो. अनिल बाबूना तुरुंगात टाकल्यानंतर मतदार संघातील नागपूर ते मुंबई पाठपुरावा करत होतो. विधिमंडळात तुमचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे, गरीबाचे, तरुणांचे, महिलांचे मुद्दे विधिमंडळात उचलणार असा विश्वास देतो. अनिल देशमुख यांना मी आश्वासित केलय, तुम्ही विदर्भात फिरून प्रचार करा. काटोलची जनता समजुतदार आहे, एकदा भूल केली होती. आता तशी भूल काटोलची जनता करणार नाही. पक्षाचे श्रेष्ठींनी मला संधी दिली. त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांचे पुत्र आणि कटोल विधानसभेचे मविआचे उमेदवार सलील देशमुख यांनी दिली आहे.
हे ही वाचा