Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार
Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार
रेल्वेने दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत', अशी टीका त्यांनी केली होती. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज हनुमान मंदिरात महाआरती करायला जाणार आहेत. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. आता यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. आदित्य ठाकरे म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी भाजपाचं नकली हिंदुत्व एक्स्पोज केले. आणि आज रेल्वेने मंदिर पडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. काही भाजपचे लोक तिथे नाटक करत आहेत. आम्ही 5.30 वाजता तिथे जाणार आहोत. भाजपचं नकली हिंदुत्व आहे. फक्त निवडणुकीसाठी हिंदुत्व वापरलं जात आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात आली आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.