पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची भाजपची घोषणा; मुरजी पटेल म्हणतात, "मी एकदम..."
First Reaction of Murji Patel : मी एकदम खूश आहे. मी पक्षाच्या आदेशाचं पालन करणार, अपक्ष निवडणूक लढवणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी दिली आहे.
First Reaction of Murji Patel : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनवोरध होईल का? याकडे लक्ष लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळेंनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. भाजपच्या निर्णयानंतर मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली. आपण पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना आपण पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं स्पष्ट सांगितलं. तसेच, मी एकदम खूश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? असं विचारल्यावर मुरजी पटेल यांनी अजिबात नाही... अजिबात नाही... असं म्हणत आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
एकीकडे मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. तसेच, त्यांनी बोलताना पक्षाचा आदेश मानणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण दुसरीकडे मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र अंधेरीत राडा घातला. कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातच घोषणाबाजी केली. तसेच, यावेळी काही अपशब्दांचाही वापर कार्यकर्त्यांनी केला.