एक्स्प्लोर

Murbad Vidhan Sabha : मुरबाड विधानसभा मतदारसंघ : भाजपचे किसन कथोरे विजयी

Murbad Assembly Constituency Election 2024 : मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे विजयी झाले आहेत.

Murbad Vidhan Sabha Election 2024 : मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे विजयी झाले आहेत. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सुभाष पवार यांना तिकीट दिलं, तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून भाजपने किसन कथोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपने किसन कथोरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. याआधी दोन टर्ममध्ये किसन कथोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. किसन कथोरे यांना गड राखण्याचं मोठं आव्हान होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांच्या उमेदवाराला मतदार सहानुभूती दाखवणार की, किसन कथोरेचं पुन्हा बाजी मारणार याकडे लक्ष लागलं होतं. दरम्यान, भाजपचे किसन कथोरे यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघ

मुरबाड विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी एक आहे. मुरबाड मतदारसंघात मुरबाड तालुका आणि कल्याण तालुक्याच्या काही भागांचा समावेश आहे. मुरबाड शहर, त्याच्या शेजारच्या गावांसह, मुरबाड नगर पंचायत, कर्जत आणि कल्याण, आसपासच्या शहरी भागातील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली यांचा या मतदारसंघात समावेश होतो. मुरबाड हे MIDC म्हणजेच 'महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' या नावानं ओळखलं जाणारे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही उद्योग असलेले एक महत्त्वाचं औद्योगिक शहर आहे. 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार, मुरबाडची लोकसंख्या अंदाजे 15,823 होती, ज्यामध्ये 54 टक्के पुरुष आणि 46 टक्के स्त्रिया असं प्रमाण आहे.
 
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार किसन शंकर कथोरे यांनी 1,74,068 मतांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे प्रमोद विनायक हिंदुराव यांना 38,028 मते मिळाली. मागील 2014 च्या निवडणुकीत भाजपचे किसन शंकर कथोरे यांनी 85,543 मते मिळवून विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादीचे गोटीराम पदू पवार यांना 59,313 मते मिळाली होती.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • किसन कथोरे (भाजप) - विजयी
  • सुभाष पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)

मुरबाड विधानसभा निकाल 2019

  • किसन कथोरे (भाजप) - 1,74,068 मते (विजयी) 
  • प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी काँग्रेस) - 38,028 मते 

मुरबाड विधानसभा निकाल 2014

  • किसन कथोरे (भाजप) - 85,543 मते (विजयी)
  • गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 59,313 मते
महत्त्वाच्या इतर बातम्या :
स्नेहल पावनाक
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Beed News : मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget