एक्स्प्लोर

Kalyan East Vidhan Sabha : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ : विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात! सुलभा गायकवाड की धनंजय बोडारे, कोण मारणार बाजी?

Kalyan East Assembly Constituency Election 2024 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ मविआकडून धनंजय बोडारे, तर महायुतीकडून सुलभा गायकवाड यांच्यात लढत आहे.

Kalyan East Vidhan Sabha Election 2024 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मविआकडून धनंजय बोडारे, तर महायुतीकडून विद्यमान आमदाराची पत्नी सुलभा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून धनंजय बोडारे यांना संधी देण्यात आली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. दोन दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी महायुतीला इशारा दिला होता. भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे महेश गायकवाड यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर महेश गायकवाड काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

मतदारसंघातील परिस्थिती

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. कल्याण पूर्वमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे गणपत काळू गायकवाड 60,332 मते मिळवून विजयी झाले होते. तर, अपक्ष धनंजय बाबुराव बोडारे उर्फ ​​आबा यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.  गणपत गायकवाड यांचा 12,257 मतांच्या फरकाने विजय झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गणपत काळू गायकवाड 36,357 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेना पक्षाचे गोपाळ रामचंद्र लांडगे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. रामचंद्र लांडगे यांचा फक्त 745 मतांनी पराभव झाला होता. 

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • धनंजय बोडारे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  • सुलभा गायकवाड - भाजप

कल्याण पूर्व विधानसभा 2019 चा निकाल

  • गणपत गायकवाड (भाजप) - 60,332 मते (विजयी)
  • धनंजय बोडारे (काँग्रेस) - 48,075 मते
  • प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 16,757 मते

कल्याण पूर्व विधानसभा 2014 चा निकाल

  • गणपत गायकवाड (काँग्रेस) - 36,357 मते (विजयी)
  • गोपाळ लांडगे (शिवसेना) - 35,612 मते
  • विशाल पावशे (भाजप) - 28,004 मते
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Embed widget