Mulund Vidhan Sabha constituency: मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिहीर कोटेचा भाजपचा बालेकिल्ला कायम राखणार का? शरद पवार गटाच्या संगीता वाजेंचं आव्हान
Mulund Vidhan Sabha constituency: मुलुंड विधानसभा मतदारसंघातील लढतीचे अपडेटस् आणि निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mulund Vidhan Sabha constituency: मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलुंड विधानसभा मतदारसंघात (Mulund Vidhan Sabha) यंदा काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या मतदारसंघावर 1990 पासून म्हणजे सलग 28 वर्षे भाजपचा (BJP) कब्जा राहिला आहे. सरदार तारासिंह यांच्यामुळे हा मतदारसंघ कायम भाजपकडे राहिला. हा मतदारसंघ गुजरातीबहुल असल्याने याठिकाणी भाजपची पारंपरिक व्होटबँक आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांना रिंगणात उतरवले आहे. मिहीर कोटेचा लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात पराभूत झाले होते. आता त्यांना विधानसभेसाठी पु्न्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या संगीता वाजे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप शिरसाट रिंगणात आहेत. त्यामुळे आता 23 नोव्हेंबरला काय निकाल येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या मतदारसंघात 2 लाख 98हजार 242 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 55 हजार 903 इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 42 हजार 336 इतकी आहे.