एक्स्प्लोर
तामिळनाडूतील 111 शेतकरी वाराणसीतून मोदींना आव्हान देणार
अय्याकन्नू यांच्या नेतृत्त्वात 2017 मध्ये दिल्लीत तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी 100 हून अधिक दिवस आंदोलन केलं होतं.
तिरुचिरापल्ली : दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर तामिळनाडूचे शेतकरी आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत हेत. राज्यातील शंभरहून अधिक शेतकरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. या 111 शेतकऱ्यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी ही माहिती दिली.
"भाजपने आपल्या जाहिरनाम्यात शेतीमालाला योग्य दरासह इतर मागण्यांचा समावेश करावा यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असं अय्याकन्नू यानी स्पष्ट केलं. "आमच्या मागण्या पूर्ण होतील, असं आश्वासन त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात देताच, आम्ही मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेऊ. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आमचा निर्णय कायम ठेवू आणि मोदींविरोधात निवडणूक लढवू," असं अय्याकन्नू यांनी सांगितंल.
अय्याकन्नू यांच्या नेतृत्त्वात 2017 मध्ये दिल्लीत तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी 100 हून अधिक दिवस आंदोलन केलं होतं.
काँग्रेससह इतर पक्षांनीही तुमच्या मागण्यांचा जाहीरनाम्यात समावेश केलेला नाही, मग भाजपकडेच ही मागणी का करत आहात, असं विचारलं असताने अय्याकन्नू म्हणाले की, "सध्या भाजप सत्ताधारी आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत." "आम्ही भाजप किंवा पंतप्रधानांविरोधात नाही. सत्तेत येण्यासाठी मोदींनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही ते आमचे पंतप्रधान आहे आणि भाजप सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करत आहोत," असं अय्याकन्नू यांनी सांगितलं.
अय्याकन्नू म्हणाले की, द्रमुक आणि अम्मा मक्कल मुनेत्र कषगम यांसारख्या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, जी शेतकऱ्यांच्या मागणीपैकी एक आहे.
आम्ही वाराणसीला जाण्यासाठी 300 शेतकऱ्यांचं तिकीट बुक केलं आहे. तिरुवन्नामलाई आणि तिरुचिरापल्लीसह अनेक जिल्ह्यातील शेतकरी वाराणसीला पोहोचतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement