एक्स्प्लोर
जो प्रश्न विचारण्याची हिंमत कुठल्याही पत्रकारात नाही तो प्रश्न अक्षय कुमारने विचारला : राज ठाकरे
बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये कोणीही गेलं नाही असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे. मला सांगा जर आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही तर मग आता सुषमा स्वराज जे म्हणाल्या त्यावर त्या आता देशद्रोही की देशप्रेमी? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
पनवेल : अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत तुम्ही आंबा खाता का असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना जोरदार टोला हाणला. अक्षय कुमारने पंतप्रधानांना काय प्रश्न विचारावा? आंबे खाता का? मजा लावली आहे का? असा सवालही उपस्थित केला. आज पनवेलमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत राज यांनी चौफेर टीका केली.
VIDEO | विधानसभेत महाआघाडी मनसेला जागा सोडणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
नोटबंदी हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा पुनर्रुच्चारही राज यांनी केलाय. देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या अगोदर उर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजाराच्या नोटा परदेशात छापल्या गेल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं, त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास तीन लाख कोटी रुपये बदलून दिले गेल्याचा आरोपही केला. नोटबंदीच्या स्कॅमवरुन कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांना भाजप उत्तरं का देत नाही असा सवालही उपस्थित राज यांनी उपस्थित केला. तसेच नोटाबंदी काळात भाजपने लाभ करुन घेतला, तो पैसा आता निवडणूक काळात वापरला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये कोणीही गेलं नाही असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे. मला सांगा जर आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही तर मग आता सुषमा स्वराज जे म्हणाल्या त्यावर त्या आता देशद्रोही की देशप्रेमी? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. एअर स्ट्राईकमध्ये किती लोक मेले, हे दुसऱ्या दिवशी सकाळी अमित शाहांना कसं समजलं? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
VIDEO | ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला | मुंबई | एबीपी माझा
आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता, भाजपवाले वेगळ्याच वावड्या उठवत आहेत. भाजपनं देशातील सर्वच महत्वाच्या संस्थांची मुस्कटदाबी केली. डिजिटल इंडिया, कॅशलेश इंडिया, रोजगार निर्मितीचं आश्वासन आदी मुद्द्यांवरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला.
VIDEO | 'राज ठाकरे राहुल शेवाळेंविरोधातही जिंकणार नाहीत' मनोहर जोशींचं आव्हान | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement