एक्स्प्लोर

Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव

Satara ZP Election : सातारा जिल्ह्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना रांजणे यांचा पराभव झाला आहे. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या त्या पत्नी आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा करिश्मा पाहायला मिळाला. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव होणं धक्कादायक मानलं जात आहे. 

कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना रांजणे यांचा पराभव 

सातारा जावळीचे आमदार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का बसला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या गटात शिवसेनेच्या कविता ओंबळे या विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा करिश्मा पाहायला मिळाला.

शशिकांत शिंदे यांच्याकडून जिल्हा बँकेच्या पराभवाची परतफेड  

ज्ञानदेव रांजणे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदे यांनी एकत्र यात कविता ओंबळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कुसुंबी गटातून भाजपला धक्का बसला आहे. ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. 

जयकुमार गोरे यांना दोन धक्के 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के बसले आहेत. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. औंध गटात देखील मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला आहे.  औंध जिल्हा परिषद गटात मनिषा फडतरे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातून विजयी झाल्या आहेत. विक्रमी 18 हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला.  सोनल गोरे यांच्या उमेदवारीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा तीव्र विरोध होता, अशी माहिती आहे.  

शंभूराज देसाईंनी पाटणचा गड राखला

जयकुमार गोरे यांनी पाटणमध्ये आक्रमक प्रचार केला होता. शंभूराज देसाई यांनी मात्र पाटण पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणलं आहे. पाटणचा बालेकिल्ला शंभूराज देसाई यांनी राखला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget