एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली !
दहा वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या पु लाल थनहवला यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. लाल थनहवला यांना चंपाई साऊथ मतदारसंघातून लालनुंतउआंगा यांनी मात दिली. मिझोरममध्ये मागील दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. पु ललथनहवला हे गेल्या दहा वर्षांपासून मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळून होते.
![मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली ! Mizoram Assembly Elections 2018 live result : Chief Minister LalThanhawla has lost, MNF's TJ Lalnuntluanga has won मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली !](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/11092644/mizoram-CM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एझोल : ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडेही लक्ष लागून आहे. मिझोरममध्ये जोरदार सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे.
सलग 13 वर्ष मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या पी. लालथनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साउथ आणि सेरछिप या दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ताज्या आकडेवारीनुसार 10 वर्षाच्या नंतर MNF पुन्हा मिझोरमच्या सत्तेत येणार आहे. मतमोजणी सुरु असली तरी एमएनएफ 26 जागांवर आघाडीवर आहे. तर गेल्या विधानसभेला 32 जागा मिळवणाऱ्या काँग्रेस केवळ 5 जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य पक्ष 8 आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे गेल्या 13 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या पु लाल थनहवला यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. राज्याचे 3 टर्म मुख्यमंत्री असलेले ललथनहवला यांना चंपाई साऊथ मतदारसंघातून लालनुंतउआंगा यांनी मात दिली. मिझोरममध्ये मागील दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. पु लाल थनहवला हे गेल्या दहा वर्षांपासून मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळून होते.
राज्यात यावेळी काँग्रेस आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंटमध्ये मुख्य लढत होती. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंटने 5 जागांवर तर मिझोरम पीपल्स फ्रंटने एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते. यावेळीही भाजपला मिझोरममध्ये विशेष यश मिळवता आलेले नाही. भाजप केवळ एकाच जागेवर आघाडीवर आहे.
मिझोरममधील ही 12 वी विधानसभा निवडणूक आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी 80 टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा 2 टक्के मतदान कमी झाले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2 तर भाजप अध्यक्ष अनिल शाह यांनी 2 प्रचारसभा घेतल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)