एक्स्प्लोर

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्लान बी?

राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. अनेक वर्ष दोन्ही काँग्रेसचे काम करणारे नेते शिवसेना, भाजपमध्ये गेल्याने विधानसभेला उमेदवार कोण असावेत याची राष्ट्रवादीने चाचपणी सुरु केली आहे.

उस्मानाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या नेत्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न वेगवेगळा पातळीवर सुरु आहेत. पण तरीही हे नेते गेलेच तर यांच्या जागी कोण उमेदवार असावेत याचा बी प्लान राष्ट्रवादीनं तयार केला आहे. नवे उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. काही नेते आधीच शिवसेना, भाजपमध्ये सामील झाले आहेत तर काही नेते वाटेवर आहेत. अनेक वर्ष दोन्ही काँग्रेसचे काम करणारे नेते शिवसेना, भाजपमध्ये गेल्याने विधानसभेला उमेदवार कोण असावेत याची राष्ट्रवादीने चाचपणी सुरु केली आहे. विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाणांवर मराठवाड्याची जबाबदारी आहे.

असा असेल काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्लान बी?

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राणा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकरांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते.

अक्कलकोट मतदारसंघात माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभेत भाजपचं काम केलेले नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ स्वामींना काँग्रेसकडून तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे.

बार्शी मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणार हे नक्की आहे. सोपल शिवसेनेत गेल्यास माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील हे इच्छुक असतील.

पंढरपूर मतदारसंघातून विद्यमान कॉंग्रेस आमदार भारत भालके भाजप प्रवेशाच्या प्रयत्नात आहेत. भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक इछुक असल्याने भालके यांना तिकीट मिळाल्यास परिचारक नाराज होणार. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले उद्योजक समाधान आवताडे यांना कॉंग्रेस आघाडीकडून तिकीट देण्याच्या प्रयत्न होईल.

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे शिवसेनेत प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याने राष्ट्रवादी याठिकाणी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. अशावेळी शिंदे विरोधी आघाडीच्या शिवाजी कांबळे यांना गळाला लावायचा प्रयत्न सुरु आहे.

करमाळा मतदारसंघ येथील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लोकसभा लढविलेले संजयमामा शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत.

आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून बळ मिळालं होतं. मात्र याच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सोडून गेलेल्या आणि सोडणाऱ्यांची संख्या वेगानं वाढत आहे.

माळशिरस मतदारसंघातून गेल्यावेळी हनुमंतराव डोळस हे राष्ट्रवादीकडून निवडुन आले होते. मात्र मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर येथून अजून एकही सक्षम नाव पुढे येत नसल्याने राष्ट्रवादी नेते अजूनही उमेदवाराच्या शोधात आहेत.

इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना याठिकाणी उमेदरवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यास इंदापूरमध्ये आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा असेल.

साताऱ्यात राष्ट्रवादी पुर्णता मोडकळीस आल्याचं पहायला मिळत आहे. साताऱ्याच्या जागेसाठी आता राष्ट्रवादीने केलेल्या चाचपणीत सध्या जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांचं नाव पुढे येत आहे. फलटण मतदारसंघात रामराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडल्यास याठिकाणी दिगंबर आगवणे याचं नाव पुढे येताना पाहायला मिळत आहे.

कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्यामुळे तेथे धैर्यशिल कदम यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसच्या जयकुमार गोरेंनी पक्ष सोडल्यात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशम यांना याठिकाणी उमेदवारी मिळू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखलABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget