मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीसाठी देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांसह बॉलीवूडचे सेलिब्रेटी आझाद मैदानावर दाखल होत आहे.
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपद तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मह्युतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला देशभरातून राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रेटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आता मान्यवर आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.
शपथ विधीसाठी कोण-कोण उपस्थित?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. तसेच महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व आमदार या सोहळ्यासाठी उपस्थित असून शरद पवार गटाचे माढाचे आमदार अभिजित पाटील हे देखील दाखल झाले.
सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडूलकर, अंजली तेंडुलकर, विक्रांत मेसी, जय कोटक, एकता कपूर, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, जानवी कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेन्द्र सराफ, राजेश अदानी, मनोज सैनिक, के के तातेड़, मृदुला भाटकर, निखिल मेसवानी, हेतल मेसवानी, नीरजा चौधरी, योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंद कुमार हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या