एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्यास उरले काही तास, कायदा व सुव्यवस्थेसाठी यंत्रणा सतर्क

Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्यास काही तास उरले आहेत.

Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात बुधवारी (दि.19) होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीये. राज्यभरात 2 लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

राज्यभरात 9 कोटी, 70 लाख 25 हजार 119 मतदार

36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4,136 उमेदवार.....यामध्ये  पुरुष मतदार  5 कोटी 22हजार 739,तर महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या आहेत,  आणि 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

राज्यात 4.69 कोटी महिला मतदार 

राज्यात एकूण महिला मतदार 4,69,96,279 आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे

मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट

1,00,427 इतक्या मतदान केंद्रांसाठी साधारणपणे 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध

आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात 532 एफआयआर दाखल 

महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्या मनुष्यबळाचा समावेश आहे. विविध तक्रारींच्या अनुषंगाने 532  एफ आय आर दाखल झाले आहेत. यापैकी 210 प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून 63प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित 259 प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.

'एफ आय आर' बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

1) मुंबई शहर व मुंबई उपनगर :  36

2) ठाणे : 38

3) पालघर : 05

4) नाशिक : 49

5) धुळे : 01

6) बीड : 18

7) अहिल्यानगर : 32

8) पुणे : 48

9) छत्रपती संभाजीनगर : 25

10 जालना : 10

11 जळगाव : 10

12 नंदुरबार : 03

13 कोल्हापूर : 26

14 रत्नागिरी : 10

15 सिंधुदुर्ग : 00

16 सातारा : 15

17 सांगली : 08

18 सोलापूर : 28

19 लातूर : 12

20 धाराशिव : 06

21 रायगड : 19

22 परभणी : 07

23 नांदेड : 15

24  हिंगोली : 12

25 यवतमाळ : 07

26 वाशिम: 03

27 वर्धा : 06

28 अमरावती : 17

29 अकोला : 02

30 बुलढाणा : 08

31 चंद्रपूर : 03

32 गडचिरोली : 06

33 भंडारा : 15

34 गोंदिया : 03

35 नागपूर : 29

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.
 
इतर महत्त्वाच्या बातम्या 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget