एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी: महायुती राज ठाकरेंच्या मदतीची बिनशर्त परतफेड करणार; निवडक मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?

Maharashtra Vidhansabha Election 2024: आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Maharashtra Vidhansabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. 

लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कोणत्याही अटी न ठेवता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.

एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा-

काही जागांवर पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिदी देखील समोर येत आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस-ठाकरेंमध्ये दोन तास चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी-

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयावर महाविकास आघाडीने बरीच टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड केली जाईल, असे सांगितले जाते.

राज ठाकरेंनी आतापर्यंत घोषित केलेले मनसेच्या उमेदवारांची यादी-

1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान-

महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.  

संबंधित बातमी:

वडाळ्यात ठाकरे गटाचं पोलीस कार्ड; माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगतापही निवडणुकीच्या रिंगणात, कालिदास कोळंबकरांना टफ फाईट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Embed widget