वडाळ्यात ठाकरे गटाचं पोलीस कार्ड; माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगतापही निवडणुकीच्या रिंगणात, कालिदास कोळंबकरांना टफ फाईट
वडाळ्याच्या मतदारसंघातून महाविकासआघाडीच्या तिकिटावर श्रद्धा जाधव या जागेवर इच्छुक आहेत. तर दुसरीकडे संजय जगताप देखील इच्छुक आहेत. आता ठाकरे गटाकडून कोणाला तिकिट मिळतय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : राजकीय नेत्यांपाठोपाठ अनेक अधिकाऱ्यांनाही निवडणुकीची (Vidhan Sabha Election 20240 भुरळ पडलीये. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या पाठोपाठ माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगतापही (Sanjay Jagtap) आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात वडाळ्यातून जगताप निवडणूक लढवणार आहेत. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन ठाकरे गटात ते प्रवेश करणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटातून मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगतापही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे वडाळा विधानसभा मतदारसंघात पोलीस कुटुंबीयांची संख्या जास्त आहे. वडाळ्याची जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. वडाळ्याच्या मतदारसंघातून महाविकासआघाडीच्या तिकिटावर श्रद्धा जाधव या जागेवर इच्छुक आहेत. तर दुसरीकडे संजय जगताप देखील इच्छुक आहेत. आता ठाकरे गटाकडून कोणाला तिकिट मिळतय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रद्धा जाधव की संजय जगताप?
तर दुसरीकडे भाजपकडून कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) नवव्यांदा निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला मताधिक्य मिळाल्यामुळे ही निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे. कालिदास कोळंबकर यांनी सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. जर संजय जगताप यांनी महाविकासआघाडीकडून या मतदारसंघात निवडणूक लढवली तर अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
कोळंबकरांसाठी यंदाची निवडणूक कठीण
लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर ही निवडणूक कोळंबकरांसाठी कठीण मानली जाते. कारण लोकसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाला जवळपास नऊ हजार मते अधिक मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना वडाळा मतदार संघातून 70 हजार 931 मतं मिळाली. तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना 61 हजार 619 मतं मिळाली होती. वडाळा परिसरात मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या अधिक आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लवढताना मुस्लीम आणि दलित मते आपल्या बाजूने वळवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांना थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह