माढ्यात नवा ट्विस्ट! मनोज जरांगे बिघडवणार महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित? धनंजय साखळकर मानेंनी दाखल केली उमेदवारी
माढ्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचे निकटवर्तीय धनंजय साखळकर माने (Dhananjay Sakhalkar Mane) यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे.
Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात वेगानं घडामोडी घडत आहेत. माढ्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचे निकटवर्तीय धनंजय साखळकर माने (Dhananjay Sakhalkar Mane) यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवारी दाखल केल्याचा दावा माने यांनी केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून जरांगे इफेक्टमुळे 55 हजार मतांची आघाडी महाविकास आघाडीला मिळाली होती. यामुळेच माढ्यात उमेदवार देण्यावर जरांगे पाटील गांभीर्याने विचार करत असतानाच आता त्यांचे निकटवर्तीय धनंजय माने साखळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामुळं माढ्यात नवी ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता
गेल्या काही दिवसापासून माढा विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातच वेगानं घडामोडी घडत आहेत. शरद पवार गटाकडून माढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाकडून मिनल साठे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याचबरोबर विदयमान आमदार रणजित शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक धनंजय साखळकर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माढ्यात रंगतदार लढत होणार
माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. मिनल साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी देखील शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना देखील डावलन्यात आलं आहे. त्यामुळं रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता मनोज जरांगे यांचे समर्थक धनंजय साखळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं माढ्यात रंगतदार लढत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: