एक्स्प्लोर
Rohit Pawar on Voter List Row : बोगस मतदार नोंदणी, रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप पदाधिकारी देवांग दवे यांच्यावर बोगस मतदार तयार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पवार यांच्या मते, 'आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय अॅड करायचं काय माइनस करायचं हे दवेनी त्या त्या आमदारांना नाहीतर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे.' निवडणूक आयोगाची वेबसाईट वापरून हेराफेरी केली जात असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी, पवार यांनी पत्रकार परिषदेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांना त्यांनी 'ट्रम्प तात्या' संबोधले, यांचे बनावट मतदार ओळखपत्र तयार करून दाखवले. या प्रात्यक्षिकातून त्यांनी दाखवून दिले की कशाप्रकारे बनावट आधार क्रमांकाचा वापर करून मतदार यादीत नावे घुसडवली जाऊ शकतात. देवांग दवे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक आयोगाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















