मोठी बातमी! माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवार गटाकडून काँग्रेसच्या मिनल साठे मैदानात
अखेर माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. माढ्याच्या नरगारध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.
Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडींना वेगल आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अखेर अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं महायुतीचा नेमका उमेदवार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अखेर माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. माढ्याच्या नरगारध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.
माढ्यात रंगतदार तिरंगी लढत होणार
माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. मिनल साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे. त्यामुळं माढ्याच्या मैदानात आता तिरंगा सामना रंगणार आहे. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी देखील शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना देखील डावलन्यात आलं आहे. त्यामुळं रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं माढ्यात रंगतदार तिरंगी लढत होणार आहे.
कोण आहेत मिनल साठे?
अॅड. मिनल साठे या माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सून आहेत.
मिनल साठे या सध्या माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून त्या काँग्रेस पक्षाचे काम करत होत्या.
मिनल साठे यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानं माढ्याचा तिढा सुटला आहे. आता माढ्यात तिरंगी लढत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माढा मतदारसंघाची जोरदार चर्चा होती. मात्र, अखेर सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळं माढ्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. काल माढ्यात आमदार बबनदादा शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रणजित शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज अभिजीत पाटील शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: