एक्स्प्लोर

जाता-जाता मुख्यमंत्र्यांनी वाढवलं आदित्य ठाकरेंचं टेन्शन, घेतला 'हा' मोठा निर्णय

CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणे आणि मुंबईतील अनेक मतदारसंघात आढावा घेत होते.

CM Eknath Shinde : आज राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  मतदान प्रक्रिया सर्वत्र पार पडत असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणे आणि मुंबईतील अनेक मतदारसंघात आढावा घेत होते. दरम्यान, मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाताना, मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा सायंकाळी 5 च्या सुमारास वरळी मतदारसंघात घुसवल्याचे पाहायला मिळालं. वरळीतील मतदान केंद्र आणि पदाधिकार्यांशी मुख्यमंत्र्यानी संवाद साधला. 

शेवटचा तास उरला असताना मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीत

मतदान संपण्यास शेवटचा तास उरला असताना, मुख्यमंत्री ठाण्याच्या दिशेने रवाना होतं होते, यावेळी जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा वरळीत फिरवला. जवळपास अर्धातासहून अधिक वेळ मुख्यमंत्री वरळीत होते. मुख्यमंत्र्याच्या वरळीतील या धावत्या भेटीने आदीत्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी सत्तांतरानंतर आदीत्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यात जाऊन आवाहन दिलं होतं. आदीत्य ठाकरेंनी शिंदेंना त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचं आवाहन दिलं होतं.

वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष

वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुत्र युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच मनसेचे संदीप देशपांजडे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून अमोल आनंद निकाळजे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरा सामना हा आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवर यांच्यातच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेकडे विशेष लक्ष दिलं आहे. मात्र, या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणारे हे आपल्याला येत्या 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंतर आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकलं हे जरी 23 नोव्हेंबरला समजणार असलं तरीदेखील एक्झिट पोलचे ( Exit Polls) आकडे समोर आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात

 

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget