एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?

Maharashtra Exit Polls Result 2024: विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती.

Maharashtra Exit Polls Result 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे.  (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)

विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे (Elnath Shinde) यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.

काय आहेत एक्झिट पोलचे अंदाज?

चाणक्य एक्झिट पोलचे अंदाज

शिवसेना (शिंदे) – 48
शिवेसना (ठाकरे) – 35

पोल डायरी एक्झिट पोलचे अंदाज

शिवसेना (शिंदे) – 27-50
शिवेसना (ठाकरे) – 16-35

मॅट्रिझ एक्झिट पोलचे अंदाज

शिवसेना (शिंदे) – 37-45 
शिवेसना (ठाकरे) – 29-39

इलेक्टोरल एज एक्झिट पोलचे अंदाज

शिवसेना (शिंदे) – 26
शिवेसना (ठाकरे) – 44

लोकाशाही-मराठी रुद्र एक्झिट पोलचे अंदाज

शिवसेना (शिंदे) – 30-35
शिवेसना (ठाकरे) – 39-43

एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?

एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन, असा एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता. मात्र अनेक एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे जास्त जागा मिळत असल्याचं दिसत आहे.

10 संस्थांच्या सर्व्हेमधील ठळक वैशिष्टे

-विविध संस्थांच्या दहापैकी 7 पोलमध्ये महायुती पुढे, 3 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे
-ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात सहा पोलपैकी तीन ठिकाणी शिंदेंची शिवसेना आघाडीवर, 2 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, एका ठिकाणी समान जागा
-शरद पवार वि अजित पवार यांच्यात सहा पोलपैकी सर्व सहाही ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडी
-सर्व दहाही पोलमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष, 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज
-प्रमुख सहा पक्षांच्या लढतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या स्थानी. 14 ते 28 जागा मिळण्याची शक्यता
-अपक्षांना किमान 2, जास्तीत जास्त 29 जागा मिळण्याचा अंदाज

कोणी किती जागा लढवल्या?

महायुतीमध्ये भाजप 148, शिंदेंची शिवसेना 81, अजित पवारांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 101, शिवसेना ठाकरे गट 95 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 86 जागांवर निवडणूक लढवली. यांसह, एमआयएमने 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर, बहुजन समाज पक्षाने 237 जागांवर उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि परिवर्तन महाशक्ती पक्षाकडून मोठ्या संख्येने उमेदवार देण्यात आले होते.

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget