(Source: Poll of Polls)
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?
MNS Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll 2024 मुंबई: मनसेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला. मनसेचे राज्यात 128 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. मनसेने उमेदवार उभे केल्याने याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला बसण्याची अंदाज बांधला गेला.
राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमातून यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत केले. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यामुळे मनसेला राज्यभरात किती जागा मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला यंदाच्या निवडणुकीतही अपयश
वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला यंदाच्या निवडणुकीत देखील अपयश मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला इतरमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मनसेसह, वंचित, एमआयएम, अपक्ष आणि तिसरी आघाडी यांना मिळून किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता-
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महायुतीला 125-140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मनसेला 2 ते 4 जागा आणि वंचितला 2 ते 3 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ELECTORAL EDGE च्या एक्झिट पोलनूसार कोणाला किती जागा मिळणार?
भाजप- 78
काँग्रेस- 60
एनसीपी-एसपी- 46
शिवसेना-उबाठा- 44
शिवसेना- 26
एनसीपी-अजित पवार- 14
मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर- 20
चाणक्य एक्झिट पोलचा अंदाज काय?
यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. तर अपक्ष, मनसे, वंचितच्या उमेदवारांचा 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष-
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष-
महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय?
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर (मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष) - 12-29
MATRIZE च्या एक्झिट पोलचा अंदाज काय?
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
आणखी वाचा