Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
Chinchwad Assembly constituency: भाजपकडून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना संधी देण्यात आली आहे.
Chinchwad Assembly constituency: महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघानंतर आता चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील उमेदवारीबाबतचा तिढा सुटला आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारी आज जाहीर झाली आहे. चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाल्याचं चित्र काही दिवसांपुर्वी निर्माण झालं होतं. महायुतीकडून भाजपने याठिकाणी आपला उमेदवार जाहीर केला आहे. पहिल्या यादीमध्ये शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून तीन जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपकडून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना संधी देण्यात आली आहे.
चिंचवडमध्ये नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं अर्ज दाखल करणार
चिंचवडमध्ये आधी महायुतीने शंकर जगतापांना तर नंतर महाविकास आघाडीने राहुल कलाटे यांना संधी दिली. नाना काटेंना डावलण्यात आलं. मात्र मी लढणार, असं म्हणत बंडखोरी करण्यावर नाना काटे ठाम आहेत. काटे उद्याचं अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईवरून शहरात दाखल होताच ते पत्रकारांसमोर भूमिका जाहीर करतील.
नाना काटे, राहुल कलाटे आणि चंद्रकांत नखाते यांनी घेतली होती शरद पवारांची भेट
चिंचवडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी तिन्ही इच्छुक नेत्यांनीशरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या. त्यामुळं या तिघांचं एकमत झालं नाही तर पवार स्वतः एकाच्या नावाची घोषणा करणार होते. त्यानंतर आज चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर आता नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. त्यानंतर आता नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.
भोसरीतून अजित गव्हाणेंना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमधून राहुल कलाटे तर भोसरीतून अजित गव्हाणे यांची उमेदवारी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघाचा तिढा सुटला आहे.
आज जाहीर झालेली
कारंजा- ज्ञायक पाटणी
हिंगणघाट- अतुल वामदिले
नागपूर हिंगणा- रमेश बंग
अणुशक्तीनगर- फहाद अहमद
चिंचवड- राहुल कलाट
भोसरी- अजित गव्हाणे
बीड माजलगाव- मोहन बाजीराव जगताप
परळी- राजेश देशमुख
मोहोळ- सिद्धी रमेश कदम