एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईची सत्ता ठरवणाऱ्या उपनगरावर कोणाची पकड? मुंबई उपनगरातील सर्व 26 आमदारांची यादी!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार जागा आणि विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे. उपनगर जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हा माहिम कॉजवे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे पर्यंत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 1990 मध्ये मुंबई शहर आणि उपनगर असे  दोन जिल्हे तयार करण्यात आले. पण, या दोन्ही जिल्ह्यांची  नागरी सुविधांची जबाबदारी बृहन्मुंबई महापालिकेकडे आहे.  मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागीय कार्यालयांमध्ये विभागला गेला आहे.  पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर उपविभागीय अधिकारी या दोन कार्यालयांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन प्रशासकीय उपविभाग (तालुके) अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला यांचा समावेश आहे. मुंबई  उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार जागा आणि विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे. उपनगर जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हा माहिम कॉजवे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे पर्यंत आहे. 

कधीकाळी मुंबईत काँग्रेस आणि कम्युनिस्ट, समाजवादी विचारांच्या पक्षांचा मोठा पगडा होता. मुंबई शहर-उपनगरातील गिरणी आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या चळवळी खिळखिळ्या झाल्या. याचा परिणाम कामगार चळवळी मोडित निघाल्या.पण,  त्याच वेळेस कष्टकरी वर्गांच्या प्रश्नावर राजकारण करणारे डावे पक्ष देखील कमकुवत झाले. तर, दुसरीकडे मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले. काँग्रेसनेदेखील आपल्या विचारांचा मतदार टिकवून धरला. दुसरीकडे  शिवसेनेच्या जोडीने भाजपने आपली स्थिती आणखीच भक्कम केली. मुंबई उपनगरात जनसंघ आणि त्यानंतर भाजपला मानणारा एक वर्ग आहे.  1991 मध्ये देशाने स्वीकारलेल्या नव्या आर्थिक धोरणांचा परिणाम मुंबईतील राजकारणावरही झाल्याचे दिसते. 

मुंबई उपनगरातील राजकीय स्थिती...

मुंबई उपनगरात 26 विधानसभा मतदारसंघ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजप-एकसंध शिवसेनेची सरशी झाली होती. 2019 मध्ये आलेले महाविकास आघाडीचे सरकार आणि 2021 मध्ये शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर उपनगरातील राजकीय स्थितीतही मोठा बदल झाला आहे. 

2024 मध्ये  झालेल्या लोकसभा मतदारसंघात मुंबई उत्तर मतदारसंघात भाजप-महायुतीची एकतर्फी सरशी झाली. तर, दुसरीकडे  उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट-महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गट-महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. तर, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-महाविकास आघाडीने भाजपचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. 

मुंबई उपनगराची लोकसंख्या ही जवळपास एक कोटींच्या घरात आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात मराठी भाषिकांच्या तुलनेत इतर भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये गुजराती आणि हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. हा मतदारवर्ग काही विधानसभा मतदारसंघात निर्णायक आहे. 

मुंबई उपनगरात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्थिती भिन्न आहे. पूर्व उपनगरात मराठी भाषिकांची संख्या चांगल्या प्रमाणावर आहे. तर, पश्चिम उपनगरात पूर्व उपनगराच्या तुलनेत कमी आहे. उपनगरातील मतदारसंघातील प्रश्न हे विधानसभानिहाय आणि उपविभागनिहाय बदलताना दिसतात. त्यामुळे स्थानिक राजकारणावर आणि मतदारांवर ज्याची पकड अधिक भक्कम असेल, त्यांचाच वरचष्मा राहण्याची स्थिती आहे. 2019 च्या विधानसभा  गुजरातीबहुल भागात भाजपचा जोर असल्याचे चित्र आहे. तर, मराठीबहुल भागात शिवसेनेच्या पारड्यात लोकांची मते टाकली.  आता, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याने राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. 

उपनगरात भाजपची आघाडी

मुंबई उपनगरात 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध-शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपने 12 जागांवर विजय मिळवला. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरात घाटकोपर, मुलुंड भागात भाजप उमेदवारांनी विजय मिळवला. तर एकसंध असलेल्या शिवसेनेने 10 मतदारसंघात विजय मिळवला. शिवसेनेतील बंडानंतर 4 जणांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे आता ठाकरेंकडे सहा आमदार आहेत. तर, चार मतदारसंघात काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि समाजवादी पक्षाकडे एक जागा आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेस सोडून अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा आहे.   

मुंबई उपनगर आमदारांची यादी :

 क्रमांक मतदारसंघ आमदाराचे नाव राजकीय पक्ष
1 बोरीवली सुनील दत्तात्रय राणे भाजप
2 दहिसर चौधरी मनीषा अशोक भाजप
3 मागाठाणे प्रकाश राजाराम सुर्वे  शिवसेना-शिंदे
4 कांदिवली अतुल भातखळकर  भाजप
5 चारकोप योगेश सागर  भाजप
6 मालाड (पश्चिम) अस्लम रमजनाली शेख  काँग्रेस
7 जोगेश्वरी (पूर्व) रवींद्र दत्ताराम वायकर  शिवसेना शिंदे- (खासदार निवडून गेल्याने आमदारकीचा राजीनामा)
8 दिंडोशी सुनील प्रभू  शिवसेना ठाकरे गट
9 गोरेगांव विद्या जयप्रकाश ठाकूर  भाजप
10 वर्सोवा डॉ. भारती लव्हेकर  भाजप
11 अंधेरी (पश्चिम) अमीत भास्कर साटम  भाजप
12 अंधेरी (पूर्व) ऋतुजा लटके (पोटनिवडणूक)  शिवसेना ठाकरे गट
13 मुलुंड कोटेचा मिहिर चद्रकांत  भाजप
14 विक्रोळी राऊत सुनील राजाराम  शिवसेना ठाकरे
15 भांडुप (पश्चिम) रमेश गजानन कोरगावकर  शिवसेना ठाकरे
16 घाटकोपर (पश्चिम) राम कदम  भाजप
17 घाटकोपर (पूर्व) पराग शाह  भाजप
18 मानखुर्द शिवाजीनगर अबू आसीम आझमी  समाजवादी पक्ष
19 विलेपार्ले अळवणी पराग  भाजप
20 चांदीवली दिलीप भाऊसाहेब लांडे  शिवसेना शिंदे
21 कुर्ला (अजा) मंगेश कुडाळकर  शिवसेना शिंदे
22 कलिना संजय गोविंद पोतनीस  शिवसेना ठाकरे
23 वांद्रे (पूर्व) झिशान बाबा सिद्दीकी  काँग्रेस
24 वांद्रे (पश्चिम) अ‍ॅड. आशिष बाबाजी शेलार  भाजप
25 अणुशक्तीनगर नवाब मलिक  राष्ट्रवादी (अजित पवार गट)
26 चेंबूर प्रकाश वैकुंठ फातर्पेकर  शिवसेना ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget