एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!

कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

Kolhapur District Assembly Constituency : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही घमासान सुरूच आहे. महाविकास आघाडीमध्ये 260 जागांवर तोडगा निघाला असून अजूनही 28 जागांवर चर्चा सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही (Kolhapur District Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये तीन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

महायुतीचा कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार निश्चित

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा पारंपरिकपणे शिवसेनेचा मतदारसंघ समजला जातो. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघांमध्ये ताकद विभागली गेली आहे. महायुतीकडून कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघांमध्ये संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला होता.

राधानगरीसाठी काँग्रेसकडून जोर 

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार ज्या ठिकाणी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. 2019 मध्ये ही काँग्रेसने या जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे. राधानगरी मतदारसंघ सुद्धा वादामध्ये अडकला आहे. या मतदारसंघामध्ये माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. मात्र या दोघांची उमेदवारी ज्या पक्षाला हा मतदारसंघ वाटायला जाईल त्यांच्याकडूनच ते रिंगणामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसला मिळतो की ठाकरे गटाला मिळतो याकडे लक्ष असेल.

या मतदारसंघातून प्रकाश आबिटकर विद्यमान आमदार आहेत. ते सुद्धा शिंदे गटात आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्याने शाहू महाराजांना भरभरून मतदान दिले होते. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी होऊ शकतो असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यामुळे या मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून ताकद लावली जात आहे.

राधानगरी आणि शिरोळच्या बदल्यात कोल्हापूर उत्तर देणार?

दुसरीकडे शिरोळमध्ये सुद्धा उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत चांगली चर्चा सुरू आहे. माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, या मतदारसंघावर सुद्धा काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यामुळे राधानगरी आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ काँग्रेसने जागावाटपाच्या बोलणीत आपल्याकडे खेचल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत कोल्हापुरात ठाकरे गटाकडे शाहूवाडी आणि कोल्हापूर उत्तर असे दोन मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये हे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याचीच उत्सुकता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranjitsinh Mohite Patil : आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार
Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
Jitendra Awhad : एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वादRajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!Raj Thackeray On Accused Bail : विनयभंगाची केस असताना जामीन कसा? राज ठाकरेंचा सवालRaj Thackeray satkar : फुलांचा वर्षाव, ढोल-ताशा,  टोलमुक्तीसाठी राज ठाकरेंचा ठाणेकरांकडून सत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranjitsinh Mohite Patil : आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार
Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
Jitendra Awhad : एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पाली भाषेचं ज्ञान आवश्यक, पाली भाषा जिवंत ठेवणं सर्वांची जबाबदारी : नरेंद्र मोदी
भाषा संवादाचं माध्यम केवळ नसते, संस्कृती अन् परंपरेचा आत्मा असते, पाली भाषा जिवंत ठेवण्याची गरज :नरेंद्र मोदी
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
Baba Siddique Gunshot: बाबा सिद्दीकींसोबत असणाऱ्या पोलीस सुरक्षारक्षकाने मारेकऱ्यांवर काऊंटर फायरिंग का केली नाही? समोर आला नवा अँगल
बाबा सिद्दीकींसोबत असणाऱ्या पोलीस सुरक्षारक्षकाने मारेकऱ्यांवर काऊंटर फायरिंग का केली नाही? समोर आला नवा अँगल
Maharashtra Assembly Elections 2024 : 'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
Embed widget