एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये शिंदे गटाकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे.

Kolhapur District Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बैठकांवरती बैठका सुरू आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा पातळीवरती सुद्धा इच्छुकांची मांदियाळी मुंबई आणि दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. उमेदवारी निश्चित झाली असली, तरी जाहीरपणे सांगण्याचे धाडस अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा झालेलं नाही. सर्वच पक्षांना बंडखोरीचा धोका अटळ असल्याने ज्यांनी तयारी केली आहे त्यांना सुद्धा काळजी घ्यावी लागत आहे.

कोल्हापुरात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार?

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटप सर्वसाधारण कसं असेल याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास काँग्रेसकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले मतदारसंघात तसेच विधान परिषदेत सतेज पाटील आणि शिक्षक पदवीधरमधून जयंत आसगावकर असे सहा आमदार आहेत. त्यामुळे या विद्यमान जागा काँग्रेसकडेच राहण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूरमध्ये प्रबळ असून त्यांच्याकडे विद्यमान आमदार असलेले प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ राधानगरी-भुदरगड, करवीरमधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित असेल असं बोललं जात आहे. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांच्या शाहू आघाडीलाच राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते त्यांच्याच पक्षाकडून निवडणूक लढवणार की त्यांना शिंदे गटाकडून पाठिंबा दिला जाणार की अन्य कोणता पर्याय स्वीकारला जाणार? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. 

अजित पवार गट आणि भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागणार

कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये अजित पवार यांच्या वाटेला कागल आणि चंदगड हे दोन मतदारसंघ यापूर्वीच निश्चित झाले आहेत.  कागलमधून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर चंदगडमधून सुद्धा राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण हे दोनच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर उत्तरवर भाजपकडून दावा करण्यात आला असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही स्थितीत ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. शाहूवाडी आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला सुटण्याची चिन्हे आहेत. स्वतः विनय कोरे हे शाहुवाडी पन्हाळा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर हाकणंगलेमधून अशोकराव माने यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सुद्धा कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरला आहे. या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र, विद्यमान आमदार काँग्रेसच्या जयश्री जाधव आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्याकडेच राहील अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र उमेदवार मात्र निश्चित झालेला नाही. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर हातकणंगलेमधून राजू बाबा आवळे असतील. करवीरमधून राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. काँग्रेसने या मतदारसंघांसह शिरोळवरती सुद्धा दावा केल्याची चर्चा आहे. शिरोळच्या जागेवरती ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला असून त्या ठिकाणी माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत. 

महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस चार, ठाकरे गट तीन आणि शरद पवार गटाकडे तीन जागा असे चित्र असण्याची शक्यता आहे. राधानगरी भुदरगडमध्ये के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात उमेदवारीमध्ये चुरस असून त्यांना कोणाची उमेदवारी मिळते त्यावर त्यांचा पक्ष निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहण्याची चिन्हे आहेत. 

सतेज पाटील जागावाटपाच्या केंद्रस्थानी 

जिल्ह्यात महाविकास आघाडीची जबाबदारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर असणार आहे. खासदार शाहू महाराज यांचेही बळ असेल. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेला सहापैकी पाच मतदारसंघात शाहू महाराज यांना आघाडी मिळाली होती. सतेज पाटील काँग्रेसच्या जागावाटपाच्या केंद्रस्थानी असल्याने जिल्ह्यात संख्याबळ कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. तसेच जिल्ह्यात त्यांच्या गटाची ताकद पाहता महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांसाठी सुद्धा त्यांची ताकद महत्वपूर्ण असेल.  

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget