एक्स्प्लोर

Jay Pawar: अजितदादांच्या विजयासाठी मुलगा जय पवार मैदानात; गाव-खेड्यात दौरे, म्हणाले, 'लोकसभेला ताई अन् विधानसभेला अजितदादा...'

Jay Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात लोकांनी ठरवलं होतं, लोकसभेला सुप्रिया ताई आणि आता विधानसभेला अजितदादा त्याच्यामुळे लोक भरघोस मताने दादांना निवडून देतील असा विश्वास जय पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

बारामती: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वत्र प्रचार सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचं कुटूंब प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे. आज बारामतीमध्ये अजित पवारांचा प्रचार करण्यासाठी जय पवार गाव भेट दौरा करत आहे. यावेळी त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात लोकांनी ठरवलं होतं, लोकसभेला सुप्रिया ताई आणि आता विधानसभेला अजितदादा त्याच्यामुळे लोक भरघोस मताने दादांना निवडून देतील असा विश्वास जय पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघात जय पवार गाव भेट दौरा करत आहेत. नव्या पिढीला संधी द्या, असे शरद पवार म्हणाले होते त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही असे जय पवार म्हणाले. तसेच छगन भुजबळ यांच्या संदर्भात मला काही माहिती नाही मी ते वाचले नाही असं जय पवार म्हणाले आहेत.

आम्ही वाड्या वस्त्यांवरती जात आहोत. गाव भेट दौरे करत आहोत, प्रचार करत आहोत. महिला, युवा आणि सर्वांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहेत. आत्तापर्यंत अजित पवारांनी केलेलं काम, योजना, पाणी, रोजगार आणि बाकी योजना या मुद्द्यांना घेऊन आम्ही अजित पवारांचा प्रचार करत आहोत. लोकसभेच्या वेळी जे लोक शरद पवारांच्या बरोबर होते ते लोक आता अजित दादांसोबत असल्याचं दिसून येत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, असंही यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीकरांनी आधीही ठरवलं होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला अजित दादा, एकदा बारामतीकरांनी ठरवलं तर ते  पार पाडतात. सगळी मते दादांच्या बाजुने आहेत. 

छगन भुजबळांच्या सदर्भात जय पवारांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांच्याबाबतीत आलेली बातमी मी पाहिली नाही. वाचली नाही, त्यामुळे मी त्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget