तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही अजित दादा हेच वाली;अनिल देशमुखांच्या घरा समोर लागले डिवचणारे होर्डिंग्ज
Nagpur News : नागपुरातील अनिल देशमुखांच्या घराबाहेर शरद पवार गटाला डीवचणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत.
![तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही अजित दादा हेच वाली;अनिल देशमुखांच्या घरा समोर लागले डिवचणारे होर्डिंग्ज Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Destructive hoardings were put up in front of Sharad Pawar group Leader Anil Deshmukh s nagpur house maharashtra politics marathi news तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही अजित दादा हेच वाली;अनिल देशमुखांच्या घरा समोर लागले डिवचणारे होर्डिंग्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/7d40f72030ab0ac76907b2914b2b1ea01732515527087892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्याच्या विधानसभा (Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या (Mahayuti) बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. तर राज्याच्या सत्तेची चावी महायुतीला मिळाली असून मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे ही लवकरच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दारुण पराभवाला समोर जावे लागले असून अनेक दिग्गज नेत्यांना हार पत्करावी लागली आहे. अशातच आता या जय-पराजयाच्या खेळात नागपुरात होर्डिंग वॉर रंगल्याचे दिसून आले आहे. 'तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही अजित दादा हेच वाली' असा आशयाचे बॅनर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासमोर लागले आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला होर्डिंग्जच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या या बॅनरची एकच चर्चा रंगली आहे.
अनिल देशमुख यांच्या घरासमोर डिवचणारे होर्डिंग्ज
“महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार” “तुतारीच्या नवनियुक्त १० आमदारांचेही आता अजीत दादा हेच वाली” असा आशय या बॅनरवर लिहाण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर हे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने या बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. होर्डिंग्जमधून अजित दादा हेच खरे राष्ट्रवादीचे वारसदार असल्याचे होर्डिंग मधून सांगण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या नावाला सिंग्नल ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.
कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)