Amol Kolhe: 'अजितदादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा...' त्यांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टिक, नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे
Amol Kolhe: आजच्या जाहीरनाम्यातून अजित दादांनी पोकळ वादा केल्याची जहरी टीका ही अमोल कोल्हेंनी केली आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यामध्ये अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अजित पवारांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टिक झाली आहे. अजित दादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा तेवढा राहून गेला. असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्यातून खिल्ली उडवली आहे. राज्यावर तब्बल साडे आठ लाख कोटींचं कर्ज आहे, त्यानंतर ही जाहीरनाम्यातून इतकं सारं करण्याचं आश्वासन दिलं जातं आहे, असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेवेळी बहीण झाली लाडकी, असं म्हणत 2100 रुपये देण्याच्या अश्वासनावर कोल्हेंनी भाष्य केलं आहे. आजच्या जाहीरनाम्यातून अजित दादांनी पोकळ वादा केल्याची जहरी टीका ही अमोल कोल्हेंनी केली आहे.
नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे?
अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मला वाटतं त्यात एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. त्यामध्ये एक ओळ छापायची राहून गेली आहे. आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ. कारण तब्बल साडेआठ लाख कोटींचं कर्ज राज्यावर आहे असं असताना जाहीरपणे असंवैधानिक पद्धतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून जर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर इतक्या गोष्टी जर पूर्ण करायचा राहून गेल्या असतील तर मुळात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं केलं कशासाठी. या पद्धतीने पक्ष फोडून चिन्ह पळवून पक्षाचा नाव पळून जे काही मिळवलं जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून काय साध्य झालं. म्हणजे लाडके बहीण योजना याबाबत ठोस माहिती आहे, लोकसभेमध्ये झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली यांची लाडकी आणि या पद्धतीने लाडके बहीण योजना जाहीर करत असताना त्याचं बजेट आहे का इथून सुरुवात आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पेन्शन योजना या योजनेला कोणताही विरोध नाही मात्र वस्तुस्थिती काय आहे. त्याकडे पाहणे गरजेचे आहे मागच्या दोन अडीच महिन्यांमध्ये आपण पाहिलं अनेक योजनांचा निधी हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि इतर सर्व योजना वाऱ्यावरती सोडण्यात आल्या. त्यानंतर काही जीवनावश्यक वस्तू यांचे भाव स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले ते इतकं हास्यस्पद आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. सातत्याने ते गैरहजर आहेत आणि जो जीएसटी लादला जातो आणि सर्वसामान्य यांच्या खिशातून पैसा काढला जातोय यामध्ये अर्थमंत्री जीएसटी कौन्सिल मध्ये आवाज त्यांनी उठवला नाही. त्यामुळे ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहेत असा सवाल यावेळी अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
माझी महायुतीच्या सर्व नेत्यांना एक कळकळीची विनंती आहे किंवा आवाहन आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये दहा जीवनावश्यक वस्तूंची भाव स्थिर ठेवले का याची एकदा यादी द्यावी. आत्ताच दिवाळी झाली दिवाळीचा किराणा भरत असताना आमच्या सर्व माता भगिनींना सर्वसामान्य नागरिकांच्या समोर ही गोष्ट आहे. समान भरत असताना खिशाला नेमका किती खार लागलाय, हे प्रत्येकाला कळलेले आहे आणि त्यामुळे महायुतीचं आश्वासन हे केवळ पोकळ हवा आहे. आता सत्तेत येणार नाही हे माहित आहे त्यामुळे वाटेल त्या आश्वासन द्या हे सांगणं हे या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसत आहे, असा टोला माहिती सरकारला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.