एक्स्प्लोर

महायुतीच्या बाजूने जनतेचा मोठा करंट, एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळतील, मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

मध्यप्रदेश आणि हरियाणा चा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महायुतीला (Mahayuti) जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : मध्यप्रदेश आणि हरियाणा चा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महायुतीला (Mahayuti) जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी अर्थशास्त्रापेक्षा मनशास्त्राचा जो विचार केला त्याचं कौतुक केलं पाहिजे. यावेळी महायुतीच्या बाजूने मोठा करंट असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

मतदानात झालेली वाढीचा फायदा भाजपलाच होणार

महायुतीला निश्चितच बहुमत मिळेल आणि बहुमतानंतर देखील अनेक पक्ष आणि अपक्ष आमच्यासोबत येऊ शकतात आणि आम्ही त्यांचा स्वीकार करु असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं कधीच म्हटलं नाही, मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असे ते म्हणाले होते. महिला मतदारांचा वाढलेला टक्का आणि एकूण मतदानात झालेली वाढ याचा फायदा आम्हालाच होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा आशिर्वाद दिला

सरकार आम्ही बनवू असेच अनेक एक्झिट पोलमध्ये सांगितलं आहे. लाडकी बहिण योजनचा आम्हाला मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठा आशिर्वाद दिल्याचे मुनगंटीवार म्हणाले. लोकसभेच्या पराभवाची मानसिकता, तणाव होता, पण यातून आम्ही बाहेर पडलो आहोत. यावेळी लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महायुतीला बहुमत प्राप्त होईल. विकासासाठी अनेक अपक्ष उमेदवार देखील आम्हाला पाठिंबा देतील असे मुनगंटीवार म्हणाले. 

एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? (Exit Poll)

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.  दरम्यान, महाराष्ट्राबाबत 10 एक्झिट पोल आले आहेत. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसत आहे. MATRIZE च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा, MVA ला 110 ते 130 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या सर्वेक्षणात महायुतीला 152-160 जागा आणि एमव्हीएला 130-138 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीने महायुती 122-186 जागा आणि MVA 69-121 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि PMARQ ने महायुती 137-157 आणि MV 126-146 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा प्रकारे जनमत चाचणीत महायुतीला 150 आणि एमपीएला 126 जागा मिळू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Exit Polls Result 2024: मोठी बातमी : राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल वाचा एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget