एक्स्प्लोर

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज, अधिकारी केंद्राकडे रवाना, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Maharashtra Gram Panchayat Election : उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यातील प्रशासन सज्ज झालं असून निवडणूक अधिकारी निवडणूक केंद्राकडे रवाना होत आहेत. 

Maharashtra Gram Panchayat Election : राज्यातील विविध जिल्ह्यांतील तब्बल 7,751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी, 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठीची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही निवडणूक होत आहे. 

Baramati Gram Panchayat Election: बारामतीतून मतदान पेट्या घेऊन अधिकारी रवाना 

आज 13 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनातून 396 निवडणूक अधिकारी, कर्मचारी मतदान पेट्या घेऊन रवाना झाले आहेत. बारामतीत 66 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर आजच निवडणूक अधिकारी पोहोचणार आहेत.

Yavatmal Gram Panchayat Election: यवतमाळमध्ये मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रशिक्षण 

यवतमाळ जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी उद्या 308 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायत पैकी 5 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. तर एका ठिकाणी मतदारांनी बहिष्कार घातला आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये फक्त एका सदस्यासाठी मतदान आहे. प्रत्यक्षात 93 ग्रामपंचायतींमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज या मतदान केंद्रावर जाण्यासाठी पोलिंग पार्टी रवाना झाल्या असून मतदान सुरळीत पार पडावे यासाठी आधीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम आणि ग्रामीण राजकारणातील महत्त्वाच्या या निवडणुकासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Bhandara Gram Panchayat Election: भंडारा जिल्ह्यात संवेदनशील मतदानकेंद्रावर पोलिसांचं लक्ष

भंडारा जिल्ह्यातील 303 आणि गोंदिया जिल्ह्यातील 345 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक उद्या 18 डिसेंबरला पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मतदान पथक (poling party) तयार झाले असून ते ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. पोलिंग पार्टीला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहनांची व्यवस्था केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव हे तीन तालुके अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 

Osmanabad Gram Panchayat Election: उस्मानाबादेत मतदानाच्या साहित्य वाटपला सुरुवात, कर्मचारी रवाना

उस्मानाबाद जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतीसह राज्यातल्या सुमारे सात हजार ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे.  त्यासाठी लागणारे साहित्य वाटप आज करण्यात आले. बॅलेट मशीन, मतपेटी यासह अन्य साहित्य देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली होती. पोलिस बंदोबस्त पाठवला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 658 मतदान केंदावर 3 लाख 65 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 39 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आलं असून 2,752 कर्मचारी आणि 37 झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभेप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा अशी मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच पदाच्या 162 जागांसाठी 888 उमेदवार तर सदस्यपदाच्या 1,435 जागांसाठी 4,960 उमेदवार रिंगणात आहेत

Vidarbha Gram Panchayat Election: विदर्भात अनेकांची प्रतिष्ठा पणाला 

एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून आज त्या त्या गावात पोलिंग पार्टी रवाना होतील. विदर्भामध्ये दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात 236 तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सोबतंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गावामध्येसुद्धा निवडणूक होत आहे. या व्यतिरिक्त विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात सुनील केदार, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, मंत्री संजय राठोड यांच्या सारखे सारखे दिगग्ज नेत्यांचा समावेश आहे.

Buldhana Vidarbha Gram Panchayat Election: बुलढाण्यात प्रशासन सज्ज

बुलढाणा जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास अडीच हजार कर्मचारी निवडणुकांसाठी नियुक्त केले असून आज हे सर्व कर्मचारी निवडणूक साहित्य, ईव्हीएम मशिन्ससह आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी पोहचत आहेत. जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी 842 मतदान केंद्र असून एकूण 3,80,547 मतदार उद्या या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज निवडणूक कर्मचारी दुर्गम भागात वेळेवर पोहचावे म्हणून सकाळपासूनच तयारीत आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget