एक्स्प्लोर

Maharashtra Election Survey: शिंदे फडणवीस युती की, ठाकरेंची शिवसेना? 2024 च्या निवडणुकांमध्ये कोणाची सरशी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Election Survey Results: महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांसाठी दोन सर्वेक्षणं करण्यात आली आहेत. एक सर्वेक्षण झी न्यूजनं केलं आहे आणि दुसरं सर्वेक्षण टाईम्स नाऊ नवभारतनं केलं आहे.

Maharashtra Election News: वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक भूकंप पाहायला मिळत आहे. आधी शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करत ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपची (BJP) कास धरली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

न भूतो न भविष्यती अनेक गोष्टी राज्याच्या राजकारणात पहायला मिळाल्या. महाराष्ट्रातील राजकारणातील या नाट्यमय घडामोडींच्या मागे भाजपचाच हात असून 2024 च्या निवडणुकांसाठीच भाजप जुळवाजुळवर करत असल्याची मतं अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडली आहे. अशातच याचा खरंच भाजपला फायदा होणार की विरोधक मुसंडी मारणार हे निवडणूक निकालांमध्येच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजलं नसलं, तरी त्याआधी सर्वच पक्षांच्या नजरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे लागल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्यात दोन सर्वेक्षणं करण्यात आली आहेत. पहिलं सर्वेक्षण झी न्यूज आणि मेटाराइजनं केलं आहे. तर, दुसरं सर्वेक्षण टाईम्स नाऊ नवभारतनं केलं आहे. या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? आणि निवडणूक निकालांनंतर कोणाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, याचा अंदाज बांधण्यात आला आहे. आता दोन्ही सर्व्हेक्षणात कोणत्या पक्षाला फायदा होतोय? आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार? याचे निष्कर्ष समोर आले आहेत. 

झी न्यूज आणि मेटाराइजच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय? 

दोन्ही सर्वेक्षणांचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. झी न्यूजनं आपल्या सर्वेक्षणात जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार बनू शकतं? हा प्रश्न विचारला. सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे आणि भाजप (युती सरकार) गटाला 165 ते 185 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाला बहुमत मिळत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच, सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, महाराष्ट्रातील आघाडी सरकार 145 चा बहुमताचा टप्पा ओलांडू शकतं. तर, महाविकास आघाडीला (MVA) 88 ते 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला दोन ते पाच तर इतरांना 12 ते 22 जागा मिळू शकतात.

टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणाचा आश्चक्यकारक निष्कर्ष  

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रात दुसरं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण TNN नं केलं. या सर्वेक्षणात जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता की, आज लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आता आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात भाजपला 22 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला (MVA) 18 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एक ते दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget